India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाडेकरूचा घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार… रोकडोबावाडीतील धक्कादायक प्रकार

India Darpan by India Darpan
May 15, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीवे मारण्याची धमकी देत भाडेकरूनेच घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल रन्नवरे (३० रा. रोकडोबावाडी, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांच्या शेजारी राहतात. तक्रारदार महिलेच्या घरातील एका रूममध्ये संशयित भाडेतत्वावर राहतो. घरमालकाकडे त्याचे येणे जाणे असल्याने पीडितेशी त्याची ओळख होती.

गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी रन्नवरे याने मुलीला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले. तिच्या अंगलट केले.  तुला मारून टाकेन, नदीत फेकून देईल, अशी धमकी देत त्याने बलात्कार केला. यानंतरही त्याने सुमारे वर्षभर वेळोवेळी धमकी देत मुलीवर बलात्कार केला. संशयिताचा अत्याचार वाढल्याने पिडीतेने आपल्या आईकडे आपबिती कथन केली. त्यामुळे हा प्रकार पोलिसात पोहचला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.


Previous Post

आर्टीलरी रोड भागात घरफोडी… पिंपळगाव खांबला फार्म हाऊसचे लोखंडी अँगल लांबवले…

Next Post

नाशकात चक्क ८ किलो श्रीखंडाची चोरी… भाभानगरच्या चितळे दुकानात असा घडला प्रकार…

Next Post

नाशकात चक्क ८ किलो श्रीखंडाची चोरी... भाभानगरच्या चितळे दुकानात असा घडला प्रकार...

ताज्या बातम्या

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group