India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुद्रा लोनच्या नावे दीड लाखाची फसवणूक तर नाशिकरोडला भरदिवसा घरफोडी

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुद्रालोन काढून देण्याचा बहाणा करून एकाने दीड लाखाची फसवणूक केली आहे. या फसणूक प्रकरणी सुयोग सुरेश शौचे (४६ रा.गुलालवाडी व्यायाम शाळा भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचे यांना व्यवसायासाठी सरकारी योजनेतून कर्ज घ्यायचे होते. ऑनलाईन ते कर्ज प्रकरणाची पाहणी करीत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. विविध कर्ज प्रकरणांची माहिती देत त्यांनी सरकारी मुद्रा लोनचीही माहिती दिली. यावेळी शौचे यांनी मुद्रालोनचे व्याजदर जास्त असल्याचे सांगितले असता संशयितांनी व्याजदराची टक्केवारी कमी करण्यासह कर्ज काढून देण्याची हमी दिली.

या कामी गेल्या जानेवारी महिन्यात भामट्यांनी त्यांना बँक खात्यात १ लाख ५८ हजार रूपयांची ऑनलाईन रक्कम भरण्यास भाग पाडले. पाच महिने उलटूनही कर्ज पुरवठा न झाल्याने व संशयितांशी संपर्क तुटल्याने शौचे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक शरद निंबाळकर करीत आहेत.

भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी ७८ हजाराचा ऐवज चोरून नेला
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. याप्रकरणी चेतन कैलास उगले (रा.गुरू शरण सोसा.ग्रीनपीस कॉलनी,धोंगडेनगर दत्तमंदिर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उगले कुटुंबिय बुधवारी (दि.१०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ७८ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.


Previous Post

सिन्नर फाटा येथे तिघांची एकास बेदम मारहाण तर जेलरोडला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

Next Post

एकनाथ शिंदेंकडून नैतिकतेची अपेक्षा करणं म्हणजे हा त्यांच्यावरच अन्याय – जयंत पाटील

Next Post

एकनाथ शिंदेंकडून नैतिकतेची अपेक्षा करणं म्हणजे हा त्यांच्यावरच अन्याय - जयंत पाटील

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group