नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉक्टरसह त्यांच्या भागीदाराची जमिन खरेदी विक्री व्यवहारात ६५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. शेत जमिन स्व:ताची असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका मध्यस्थीचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश कारभारी गावंड (५१ रा. अंबड),सोमनाथ काशिनाथ मंडलिक (५१ रा. दत्तमंगल अपार्टमेंट, आनंदवली), दत्तात्रेय काशिनाथ मंडलिक (५० रा. चेहडीनाका, नाशिकरोड) व अरूण भागवत पाटील अशी संशयितांची नावे आहे. त्यातील पाटील हे या व्यवहारातील मध्यस्थी असून त्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी डॉ. प्रशांत वसंतराव पाटील (५५ रा.कर्मयोगी नगर,उंटवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉ. पाटील व त्याच्या भागीदाराची या व्यवहारात फसवणूक झाली आहे. संशयितांनी आनंदवली शिवारात आपल्या मालकीची शेत जमिन असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सन.२०१५ मध्ये डॉ. पाटील व त्यांच्या भागीदाराने शेतजमीन पाहणी केली असता शेतीचे मालकच आपण असल्याचे संशयितांनी भासविले होते. त्यामुळे ३० जून २०१५ मध्ये या शेतजमिनीचा व्यवहार करण्यात आला होता.
संशयितांच्या घरी व चांडक सर्कल येथील एका हॉटेलमध्ये बोलणी होवून अॅड. अ.आय.शेख यांच्या कार्यालयात संशयितांनी डॉ.पाटील व त्यांच्या भागीदारांच्या नावे नोटरी, साठेखत करारनामा व भरणा पावती करून दिली. त्यामुळे या व्यवहारात टप्याटप्यात एकूण ६५ लाख रूपयांची रोकड रोख व आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे अदा करण्यात आली. यानंतर सात – आठ वर्ष उलटूनही संशयितांनी व्यवहार पूर्ण न केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Land Purchase Cheating FIR Doctor Property