रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जमीन खरेदी विक्री व्यवहारात ६५ लाखांची फसवणूक… चौघांवर गुन्हा दाखल…

by India Darpan
सप्टेंबर 8, 2023 | 2:58 pm
in क्राईम डायरी
0
fir


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉक्टरसह त्यांच्या भागीदाराची जमिन खरेदी विक्री व्यवहारात ६५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. शेत जमिन स्व:ताची असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका मध्यस्थीचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश कारभारी गावंड (५१ रा. अंबड),सोमनाथ काशिनाथ मंडलिक (५१ रा. दत्तमंगल अपार्टमेंट, आनंदवली), दत्तात्रेय काशिनाथ मंडलिक (५० रा. चेहडीनाका, नाशिकरोड) व अरूण भागवत पाटील अशी संशयितांची नावे आहे. त्यातील पाटील हे या व्यवहारातील मध्यस्थी असून त्यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी डॉ. प्रशांत वसंतराव पाटील (५५ रा.कर्मयोगी नगर,उंटवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉ. पाटील व त्याच्या भागीदाराची या व्यवहारात फसवणूक झाली आहे. संशयितांनी आनंदवली शिवारात आपल्या मालकीची शेत जमिन असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सन.२०१५ मध्ये डॉ. पाटील व त्यांच्या भागीदाराने शेतजमीन पाहणी केली असता शेतीचे मालकच आपण असल्याचे संशयितांनी भासविले होते. त्यामुळे ३० जून २०१५ मध्ये या शेतजमिनीचा व्यवहार करण्यात आला होता.

संशयितांच्या घरी व चांडक सर्कल येथील एका हॉटेलमध्ये बोलणी होवून अ‍ॅड. अ.आय.शेख यांच्या कार्यालयात संशयितांनी डॉ.पाटील व त्यांच्या भागीदारांच्या नावे नोटरी, साठेखत करारनामा व भरणा पावती करून दिली. त्यामुळे या व्यवहारात टप्याटप्यात एकूण ६५ लाख रूपयांची रोकड रोख व आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे अदा करण्यात आली. यानंतर सात – आठ वर्ष उलटूनही संशयितांनी व्यवहार पूर्ण न केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Land Purchase Cheating FIR Doctor Property

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) पाय घसरून पडल्याने वृध्देचा मृत्यू २) कोयताधारी तिघांवर कारवाई

Next Post

नाशिक शहरात दोन ठिकाणी महिलांचा विनयभंग… गुन्हे दाखल

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक शहरात दोन ठिकाणी महिलांचा विनयभंग... गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011