नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील अंबड लिंकरोड भागात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ७५ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. अनारीदेवी शामलाल शर्मा (रा.जाधव संकुल,अंबडलिंकरोड) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शर्मा गुरूवारी (दि.७) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत हवालदार जगताप यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
कोयता बाळगणा-या तिघांवर पोलिसांची कारवाई
कोयता बाळगणा-या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. पाथर्डी शिवारातील मुरलीधरनगर भागात संशयित परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाव घेत ही कारवाई केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दया गोपीनाथ क्षत्रिय ,सोनू प्रल्हाद सावंत (रा.पाथर्डीगाव) व लाल्या अशी संशयित कोयताधारींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर नगर भागात तिन जण कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.७) पोलिस पथकाने धाव घेत संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार कोयता मिळून आला. याबाबत अंमलदार मंगेश आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Women Death Police Action