नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सिडको परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. टवाळखोरांनी दहशत माजविण्यासाठी थेट कोयत्यानेच वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेत एकूण १६ वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सिडकोवासियांमध्ये तीव्र नाराजीचे वातावपण आहे. टवाळखोर थेट पोलिसांनाच आव्हान देत असल्याने पोलिसांनी तातडीने गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी सिडकोवासियांकडून होत आहे.
अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत एका रात्रीतून दोन घटना घडल्या आहेत जुन्या भांडणाची कुरापत काढून एका पाववडा विक्रेतावर कोयत्याने वार करत प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत सिडकोतील त्रिमूर्ती चौका जवळ हेडगेवार नगर येथे दोन मद्यंपी टवाळखोरांनी १४ चार चाकी, एक रिक्षा व एक दुचाकी वाहनांचे काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरत पसरले आहे
सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौका जवळ हेगडेवार नगर येथे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोन मद्यपी टवाळकरांनी कोयत्याच्या साह्याने रस्त्यालगत पार्क केलेली तब्बल १६ वाहनांची तोडफोड केली दरम्यान घटनेची मिळताच अंबड पोलिसांनी सीसीटीव्हीचे आधारे संशयित आरोपी जयेश हर्षवर्धन भालेराव (वय 19 रा त्रिमूर्ती चौक दुर्गा नगर) सुरज दिलीप चव्हाण (वय 19 वर्षे रा त्रिमूर्ती चौक दुर्गा नगर) यांना ताब्यात घेतले असुन त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७,४२७,५०४,५०६ ४/२५ (आर्म अँक्ट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे