त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकहून जव्हारकडे केळी घेऊन जाणारी पिकअप व्हॅन आंबोली घाटातून जात असतांना दाट धुक्यामुळे रस्त्याच्या कडेने जातांना डावीकडे पलटी झाली. या अपघातात चालकासह दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॅा. भागवत लोंढे, डॅा. सुश्रुत लोंढे आदींनी प्राथमिक उपचार करुन जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. चालक विकास सोना बडगुजर व सोबत असलेला विलास पाटील हे बेशुध्दावस्थेत होते. सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान पिकअप दरीत पलटी झाली. दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सकाळी पावणेआठ वाजेच्या दरम्यान पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्र्यंबक पोलीसांनी पंचनामा आदी सोपस्कार पार पाडले. याबाबत पो.नि. बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा. रुपेश मुळाणे, लोहार, शेख घटनास्थळी दाखल झाले. याबाबतचा तपास पो.नि. बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश मुळाणे करत आहेत.