नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खास गणेशोत्सवानिमित्त सिटी लिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोरोनामुक्त गणेशोत्सव साजरा केला जात असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेले विविध देखावे त्याचप्रमाणे गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर बसच्या जादा फेऱ्या धावणार आहेत.
गणेश भक्तांसाठी सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर दरम्यान या जादा बसेस शहरात धावणार आहेत. प्रत्येकी ४ बसेस सोडण्यात येणार आहे. तर नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते अंबड, नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल)ते पाथर्डी गाव, नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते आडगाव व नाशिकरोड ते निमाणी मार्गे जेलरोड या मार्गावर प्रत्येकी २ अशा एकूण २० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे ३ ते ८ सप्टेंबर कालावधीत सायंकाळी ६ वाजेपासून पहाटे २ वाजेपर्यंत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन सी बी एस (सिव्हील हॉस्पिटल) ते सिम्बायोसिस, नवीन सीबीएस (सिव्हील हॉस्पिटल) ते बारदान फाटा व नाशिकरोड ते नवीन सीबीएस (सिव्हील हॉस्पिटल) या मार्गावर बस धावणार आहेत.
Nashik City Bus Ganeshotsav Special Service
Citilinc NMC