India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाताळ सुटीत नाशिककरांच्या भेटीला विशेष पर्यटन महोत्सव; या पर्यटनस्थळांना देता येणार भेटी

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांच्या भेटीला नाताळ सुटीत रायझिंग नाशिक या विशेष पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष सप्ताहाद्वारे नाशिककरांना शहरासह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देता येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय, इंडिया दर्पण माध्यम समूह आणि कोकण पर्यटन संस्था यांनी पुढाकार घेतला आहे.

रायझिंग नाशिक हा विशेष पर्यटन महोत्सव सप्ताह येत्या २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. २४ डिसेंबरपासून दररोज नाशिक जिल्ह्यातील एक सहल आयोजित केली जाणार आहे. नाममात्र दरात होणाऱ्या या सहलीद्वारे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, असा हेतू आहे. या पर्यटन महोत्सव सप्ताहाचे उद्घाटन येत्या २४ डिसेंबर रोजी पर्यटन मंत्रालयाच्या सहसंचालक मधुमती सरदेसाई यांच्या हस्ते आणि कोकण पर्यटन संस्थेचे संचालक दत्ता भालेराव, इंडिया दर्पण माध्यम समुहाचे संचालक गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, देविदास चौधरी यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. तर, या पर्यटन महोत्सव सप्ताहाची सांगता दि. ३१ डिसेंबर रोजी महागंगा आरतीने रामकुंडावर होणार आहे.

या सप्ताहात आयोजित सहली खालील प्रमाणे
अ.क्र…सहल….. दिनांक
१) ममदापूर/नांदूरमध्यमेश्वर…….. २४/१२/२२
२) हतगड, स्ट्रॉबेरी फार्म……. २५/१२/२२
३) घोरवड, गोंदेश्वर, महागणपती सिन्नर…… २६/१२/२२
४) मांगीतुंगी…… २७/१२/२२
५) घोरवड, बोर्डी ……….२८/१२/२२
६) चांदवड रंगमहाल, चंद्रेश्वरी, रेणुकादेवी…… २९/१२/२२
७) भंडारदरा, सांधण व्हॅली, अमृतेश्वर……. ३०/१२/२२
८) सह्याद्री फार्म, मधमाशी गार्डन, सेवरगाव, महागंगाआरती रामकुंड………. ३१/१२/२२

सहलीचे शुल्क
रु. १५५०/- प्रोढांसाठी – सर्व सहली (बोर्डी व घोरवडसाठी १७५०)
रु.१२००/- १० वर्षाखालील बालकांसाठी. – सर्व सहली  (बोर्डी व घोरवडसाठी १४००)
सहल खर्चात समाविष्ट बाबी – प्रवास, प्रवेश फी,नाष्टा, दुपारचे जेवण, टूर गाईड, सायंकाळी चहा/काॅफी
बुकींसाठी संपर्क क्रमांक – 7030894411 किंवा 0253-2313368

Nashik Christmas Holiday Special Tourism Week
Rising Nashik Tourist


Previous Post

नाशिक शहरातील अंमली पदार्थांची विक्री व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची आ. फरांदे यांची विधानसभेत मागणी

Next Post

राज्यात इतक्या ठिकाणी आहे गोवरचा प्रादुर्भाव; नियंत्रणासाठी सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

राज्यात इतक्या ठिकाणी आहे गोवरचा प्रादुर्भाव; नियंत्रणासाठी सरकारने घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group