नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील खासगी ट्रॅव्हल्स बस आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आगीने खाक झालेल्या या बसचा पंचनामा करण्यात आला आहे. हा पंचनामा करीत असताना दोन मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता १२ झाला आहे. पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासह जखमींची विचारपूस केली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
मृतांमध्ये १० पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अद्यापही सर्व मृतांची ओळख पटलेली नाही. मृतदेह पूर्ण जळून खाक झाल्याने ओळख पटविण्यासाठी त्यांची डीएनए टेस्ट केली जाईल, असा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
Nashik Bus Fire Accident Death Toll rises