India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारोहाला नाशकात प्रारंभ; पुढील ५ दिवस बहुविध कार्यक्रम

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in साहित्य व संस्कृती
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे २०२१-२०२२ हे ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ असून संस्थेचा वर्धापन दिन २४ डिसेंबर या दिवशी असतो. या वर्षाच्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधून दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२२ या दरम्यान पंचदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या भव्य-दिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक नगरीत ‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या महाराष्ट्रातील समस्त शाखा, संलग्न संस्था आणि समस्त ब्राह्मण समाज एकत्र येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, कार्यवाह सुभाष सबनीस, कोषाध्यक्ष अनिल देशपांडे, सचिन पाडेकर, प्रवीण कुलकर्णी, गंगाधर कुलकर्णी व योगेश बक्षी हे मान्यवर उपस्थित होते.

ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यमग्न मान्यवरांचा उचित सन्मान आपापल्या क्षेत्रात विशेष उंची गाठलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते करण्याचे योजिले आहे. एकूणच या निमित्ताने ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज, सत्कारमूर्ती आणि मान्यवर यांची मांदियाळी अनुभवता येणार आहे. याशिवाय शिक्षण, उद्योग, समाजकार्य, संगीत, अभिनय, साहित्य, प्रशासन, वैद्यकीय, वैदिक, अध्यात्मिक, धार्मिक, क्रीडा, अर्थशास्त्र, ज्योतीष या व अशा विविध विषयामध्ये मानाचे स्थान प्राप्त करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. यामध्ये गिरीश ओक, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर दीपक करंजीकर, संगीतकार अशोक पत्की यांच्या बरोबर पत्रकार उदय निरगुडकर, सुशील कुलकर्णी, उद्योगपती, रवींद्र प्रभुदेसाई, विनीत माजगावकर, आशुतोष रारावीकर विनायक गोविलकर, महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री अशा मान्यवरांबरोबर विलास शिंदे, प्रकाश कोल्हे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. दररोज दहा मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे २१ ,२२ आणि २३ डिसेंबर या तीन दिवशी ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर त्यांची कीर्तने होणार आहेत.
शनिवार दिनांक २४ रोजी नाशिक शहरातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून या रॅलीमध्ये पारंपारिक वेशातील महिला, पुरुष आणि युवक सहभागी होणार असून रॅलीचे नेतृत्व जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी, करवीरपीठ, करणार आहे. याच दिवशी संध्याकाळी संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात शंकराचार्य यांच्या पाद्यपूजा आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे.
रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी संकेश्वर करवीर पीठाधिश्वर शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती महास्वामी यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील ब्राह्मण संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा संपन्न होणार असून काही मान्यवरांचा सत्कार होणार आहे.

पुरस्कारार्थी
अभिनेते – गिरीश ओक, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, सी.एल.कुलकर्णी,दीपक करंजीकर
पत्रकारिता – उदय निरगुडकर, सुशील कुलकर्णी
संगीत/गायन – अशोक पत्की, डॉ. मृदुला दाढे, डॉ.राम पंडित, मकरंद तुळणकर,
साहित्य/ग्रंथ – डॉ.मंजुषा कुलकर्णी, संतोष हुदलीकर, विलास शेळके, विनायक रानडे
उद्योग/व्यवसाय/शेती – रवींद्र प्रभुदेसाई, विलास शिंदे,सुनील धोपावकर, महेश वैद्य, प्रणव माजगावकर, देवेंद्र बापट
शैक्षणिक/सामाजिक – महेश दाबक, रतन लथ, प्रकाश कोल्हे,

वैदिक, अध्यात्मिक – अनिकेतशास्त्री देशपांडे, दिनेश वैद्य, धनंजय जोशी
प्रशासन – हर्षद आराधी, अनुश्री आराधी, विजय सूर्यवंशी, मुकुंद भट,
वैद्यकीय सेवा –डॉ.दिनकर केळकर, डॉ. अतुल वडगावकर, डॉ.विजयालक्ष्मी गणोरकर, आयुर्वेदाचार्य सुविनय दामले. डॉ. प्रसाद जोशी, डॉ. शामा कुलकर्णी, डॉ.विकास गोगटे

समाजसेवा – श्रीकांत बागुल, गजानन देवचके, प्रशांत जुन्नरे, शेखर गायकवाड
अर्थशास्त्र – डॉ.विनायक गोविलकर, डॉ. आशुतोष रारावीकर
क्रीडा – विकास काकतकर, मकरंद ओक
ज्योतिष /शिल्पकला/अध्ययन – पं.विजय जकातदार, संदीप लोंढे, विद्याधर निरंतर

अशी असेल रॅली
शनिवार दिनांक २४/१२/२०२२ रॅलीची वेळ: सकाळी ८:३० ते १०:३०
रॅलीचा मार्ग: बी. डी. भालेकर मैदान à शालीमार à नेहरू गार्डन à गाडगे महाराज पुतळा à मेन रोड à आर. के. à मेहेर सिग्नल à अशोक स्तंभ à जेहान सर्कल à भोसला सर्कल à कॉलेज रोड à टिळकवाडी à तरण तलाव à माईको सर्कल à सिबल हॉटेल à अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था. रॅलीची समाप्ती त्यानंतर – महाआरती

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकची थोडक्यात माहिती
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, ‘ब्रम्ह जानाति ब्राह्मण:’ पवित्र हिंदू धर्मानुसार ‘ब्राह्मण समाजाला ईश्वराचा ज्ञाता’ मानलं जातं. धर्माची ‘जोपासना, रक्षण आणि विस्तार’ याची जबाबदारी’ ब्राह्मण समाजाने स्वीकारली, अंगिकारली आणि समर्थपणे पेलली आहे. संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी प्रथमत: समस्त ब्राह्मण समाज संघटीत करण्याच्या मूळ उद्देशाने १९७२ साली या संस्थेची स्थापना झाली सर्वश्री ‘प्रभाकर पणशीकर, श्री.भालबा केळकर, श्री.नारायणराव नाईक’ मुंबई, ‘श्री.मो.मराठे, चंद्रशेखर जोशी’ पुणे, ‘का.पु.वैशंपायन, डॉ.नि.ह.कुलकर्णी’,नाशिक, अशा विविध शहरातील मान्यवरांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले असून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी ज्येष्ठ विधीज्ञ महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश भिडे यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे.

नाशिक शहराला पौराणिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. आजच्या समृध्द नाशिक शहराच्या विकासात या तीनही परंपरांच्या सोबतीने वैविध्यपूर्ण कलागुणांचा सहभाग अत्यंत मोलाचा ठरतो. प्राचीन काळापासून देवदेवतांनीही वास्तव्यासाठी नाशिक शहराची निवड केल्याची नोंद आहे. संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहरात असून ‘नाशिक, पंचवटी, पुणे, जुन्नर, फलटण, नीरा, शिरवळ, लोणंद आणि करमाळा’ या शहरातील शाखांद्वारे विकासकार्य अविरतपणे सुरु आहे. परिणामस्वरूप सर्वशाखीय ब्राह्मण समाज एकाच आचार आणि विचारांनी प्रेरित होवून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वचनबद्ध आहे. संस्थेची कार्यकारिणी, समाजबांधव आणि दानशूर व्यक्तींच्या इच्छाशक्तीने संस्थेचे कार्यालय, सभागृह, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय असलेली भव्य इमारत ताठ मानेने उभी आहे.

करवीर पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी, ज्येष्ठ विचारवंत मा. प्रकाशजी पाठक, शरद पोंक्षे, भालोद संस्थानचे प्रतापे महाराज, बडवाह आश्रमाचे कै.श्रीराम महाराज अशा अनेक मान्यवरांची’ भेट, आपुलकी, कार्याची दखल आणि कौतुक’ संस्थेला बळ आणि उर्जा देते. ‘संस्थेचे उल्लेखनीय कार्य समाजप्रबोधन आणि भविष्यातील प्रकल्प’ याचा उहापोह ‘सन्मार्गमित्र’ या मुखपत्रातून समाजासमोर मांडला जातो.

Akhil Brahman Sanstha 5 Days Program Nashik
Cultural Society Community


Previous Post

महात्मा गांधी हे जुन्या तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता – अमृता फडणवीस

Next Post

विधानसभेत गाजला वेठबिगारीचा प्रश्न; भुजबळ, पवारांनी धरले सरकारला धारेवर, कामगारमंत्री खाडेंनी दिले हे उत्तर

Next Post

विधानसभेत गाजला वेठबिगारीचा प्रश्न; भुजबळ, पवारांनी धरले सरकारला धारेवर, कामगारमंत्री खाडेंनी दिले हे उत्तर

ताज्या बातम्या

नाशिकच्या या प्रश्नांबाबत छगन भुजबळांनी विधिमंडळात उठविला आवाज; आता सरकार काय निर्णय घेणार?

March 24, 2023

चित्रपट शुटींगवेळी अभिनेता अक्षय कुमार जखमी

March 24, 2023

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आता हा सुद्धा गुन्हा मानला जाणार

March 24, 2023

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group