India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महात्मा गांधी हे जुन्या तर नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता – अमृता फडणवीस

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली.

न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना अमृता म्हणाल्या, मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फार महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. राजकीय वक्तव्य मी जास्त करीत नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केलेले नाही, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री कोण असावा, या प्रश्नावर फडणवीस यांनी स्पष्ट मत मांडले. त्या म्हणाल्या की, जे २४ तास राजकारणासाठी देत असतील आणि राजकारणात जे लायक आहेत त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. देवेंद्रजी २४ तास समाजासाठी झटत असतात. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मला सध्या राजकारणात यायचे नसल्याचे अमृता यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाद होण्याची चिन्हे
अमृता फडणवीस या विविध वक्तव्यांद्वारे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी नरेंद्र मोदींची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी केली आणि त्यांना राष्ट्रपिता संबोधले आहे. त्यामुळे यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Amruta Fadanvis Statement on Nation of Father Gandhi Modi


Previous Post

मेस्सी होणं सोपं नाही… अतिशय गंभीर आजार… वयाच्या ११ वर्षापासून पायात इंजेक्शन घेणं… अथक परीश्रम.. एकदा ही जीवनकहाणी वाचाच

Next Post

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारोहाला नाशकात प्रारंभ; पुढील ५ दिवस बहुविध कार्यक्रम

Next Post

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारोहाला नाशकात प्रारंभ; पुढील ५ दिवस बहुविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group