सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिककरांना नववर्षाची मोठी भेट! मार्चपासून या शहरांसाठी सुरू होणार विमानसेवा, या दिग्गज कंपनीचे आगमन

डिसेंबर 30, 2022 | 11:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नववर्ष सुरू होण्यास अवघा एक दिवसच उरला आहे. अशातच नव्यावर्षाची मोठी भेट नाशिककरांना मिळणार आहे. खासकरुन गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा आता दूर होणार आहे. नाशिकहून बहुप्रतिक्षित असलेली विमानसेवा नव्या वर्षात सुरू होणार आहे. त्यासाठी आघाडीच्या इंडिगो आणि स्पाईसजेट या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

इंडिगोचे आगमन
गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा आहे. आता इंडिगो कंपनीने नाशकात येण्याचे निश्चित केले आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. इंडिगो कंपनीची सेवा अतिशय व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यांचे आगमन नाशकात होत असल्याने आगामी काळात नाशिक विमानसेवेला मोठा वेग येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मार्चपासून सेवा
विमानसेवेच्या येत्या उन्हाळी वेळापत्रकापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून नाशिकहून ४ नव्या शहरांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा स्पाईसजेट आणि इंडिगो कंपनीने केली आहे. त्यात अहमदाबाद, बंगळुरू, नागपूर आणि गोवा या चार शहरांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या कंपनीची नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली या दोन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता या कंपनीने आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर येथील नाशिक विमानतळ प्रशासनाला दिले आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. तसेच, विमानतळाच्या ठिकाणी विविध सुविधा आणि सहकार्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

हैदराबाद, अहमदाबादसाठी दोन सेवा
एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकमधून अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव या तीन शहरांसाठी सेवा सुरू होती. मात्र, उडान योजनेची मुदत संपल्याचे कारण सांगत या कंपनीने अचानक सेवा बंद केली. त्याचा मोठा परिणाम झाला. मात्र, स्पाईसजेट कंपनीची दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांसाठीची सेवा सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. आता स्पाईसजेट आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करणार असल्याने एकूण ५ शहरांसाठी सेवा सुरू होणार आहे.  येत्या २६ मार्च ते २८ ऑक्टोबर या काळात स्पाईसजेट ही कंपनी तब्बल आठवडाभर म्हणजेच सातही दिवस नाशिकहून विमानसेवा देण्यास इच्छुक आहे. स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन्ही कंपन्या हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा देणार आहेत. नव्या वर्षात नाशिकची विमानसेवा अधित गतीमान होईल, अशी अपेक्षा पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ दत्ता भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

इंडिगो कंपनीचे संभाव्य वेळापत्रक असे
शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…
हैदराबाद…सकाळी ६.५५……..सकाळी ८.५५ (नाशिक)
नाशिक….सकाळी ९.१५…….सकाळी ११.२० (गोवा)
गोवा…..सकाळी ११.४०….दुपारी १.३५ (नाशिक)
नाशिक….दुपारी १३.५५….दुपारी ३.२० (अहमदाबाद)
अहमदाबाद….दुपारी ३.४०….सायंकाळी ५.०५ (नाशिक)
नाशिक….सायंकाळी ५.२५….रात्री ७.१५ (नागपूर)
नागपूर…..रात्री ७.३५…..रात्री ८.२५ (नाशिक)
नाशिक….रात्री ८.४५…. रात्री ११.४० (हैदराबाद)

IMG 20221230 WA0010

स्पाईसजेट कंपनीचे संभाव्य वेळापत्रक असे
शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…
नवी दिल्ली…दुपारी १२.३५……..दुपारी २.४० (नाशिक)
नाशिक….दुपारी २.५०…….दुपारी ४.४० (नवी दिल्ली)
हैदराबाद…..सकाळी ६.२०….सकाळी ७.५५ (नाशिक)
नाशिक….सकाळी ८.२०….सकाळी ९.५५ (हैदराबाद)
बंगळुरू….सकाळी ७.५५….सकाळी १०.०५ (नाशिक)
नाशिक….सकाळी १०.२५….दुपारी १२.०० (अहमदाबाद)
अहमदाबाद…..दुपारी १२.३०…..दुपारी २.०५ (गोवा)
गोवा….रात्री ४.३०…. रात्री ५.४० (नाशिक)
नाशिक….रात्री ८.००….रात्री ८.१० (बंगळुरू)
Capture 34

Nashik Air Service New Year Gift New Cities Connection
Flight Indigo SpiceJet Ozar Ojhar Civil Aviation Goa
Bengaluru Hyderabad Goa Nagpur New Delhi Ahmedabad

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेल्वेची नववर्ष भेट! मुंबईहून औरंगाबादचे अंतर अर्ध्या तासाने होणार कमी

Next Post

कांदा पिकावर रोग; शेतक-याने पिकावर फिरवला नांगर (बघा व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
20221230 122214

कांदा पिकावर रोग; शेतक-याने पिकावर फिरवला नांगर (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011