नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण 44 ग्रामपंचायती आहेत. सन 2020 ते 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. ही सोडत सभा 18 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 12 वाजता बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे होणार आहे. या सभेसाठी उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी सभेस ग्रामपंचायतींचे नागरिक, सदस्य व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Nandurbar Grampanchayat Sarpanch Reservation