नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने नांदगाव तालुका भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावरून थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचाच फोटो गायब करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेपासून ते केंद्र, राज्य तसेच तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील सर्वच जुन्या नव्या भाजपच्या नेत्यांचे या डिजिटल फलकावर फोटो आहेत.
भाजपच्या नांदगाव ‘ तालुकाध्यक्ष ‘ पदावरून तालुक्यातील राजकारणात गट – तट उफाळून आल्याने फलकावरील फोटो गायब झाल्याची चर्चा आहे. राज्यात व केंद्राच्या राजकारणात भाजप सगळीकडेच वरचढ ठरत असताना नांदगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मात्र ‘ सारं काही अलबेल ‘ नसल्याचं चित्र या फलकावरील फोटो गायब झाल्याने सध्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.