चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील असरखेडे, मतेवाडी, देणेवाडी या भागात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तर मतेवाडी परिसरात वादळी वा-यासह छोट्या स्वरुपाची गारपिठ झाली. या गारपिटीने मात्र नुकताच लागवड केलेल्या कांद्याला फटका बसला असून,त्याचबरोबर इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचले होते. हवामान विभागाने पावसा बरोबरच गारपिट होण्याची शक्यता वर्तवलेली असतांना नाशिक जिल्हयातील काही भागात आज विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाला.