India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नागपुरात महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाला जागा दिल्यानंतरही काँग्रेसचा उमेदवार रिंगणात

India Darpan by India Darpan
January 13, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – एरवी वर्षभर सूत जुळवून घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या आघाड्यांना निवडणुकीच्या जागा वाटपांनाच सुरूंग लागतो. सध्या शिंदे-फडणवीस सरकार असो वा महाविकास आघाडी असो, दोन्हींकडे सारखीच समस्या आहे. जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे, त्यात आता शिक्षक मतदारसंघाच्या नागपूरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्षक मतदारसंघाची नागपूरची जागा शिवनेसेसाठी सोडली. नागपूरमधून शिवसेनेचा उमेदवार घोषित करण्यासंदर्भात तयारी सुरू झाली. तोपर्यंत कुणीच काही बोलले नाही. पण शिवसेना ठाकरे गटाकडून गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनीही उमेदवारी दाखल केली. एवढा धक्का पुरेसा नव्हता की, काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांच्या दोन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कुणीही मागे हटायला तयार नाही.

काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षक भारतीचा समावेश आहे. त्यांचे नेतृत्व करणारे राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांनी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसने आम्हाला समर्थन देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आघाडीतील इतर कुठल्या पक्षाच्या उमेदवारीशी आम्हाला काहीच घेणेदेणे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

काँग्रेसची कसरत
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसला काय होत आहे, हेच कळेनासे झाले होते. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वासही होता. पण आता काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांनी दंड थोपटल्यामुळे काँग्रेसची पंचाईत पडली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र मधला मार्ग काढण्याची कसरत सुरू केली आहे.

Nagpur Teachers Constituency Mahalliance Dispute Politics
Vidhan Parishad Congress Shivsena Thackeray


Previous Post

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे कडाक्याच्या थंडीमुळे पाईपलाईन मध्ये बर्फ (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिक-पुणे आणि नागपूर-गोवा प्रवास होणार सुसाट; एक्सप्रेस वे मुळे विकासाला येणार वेग

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक-पुणे आणि नागपूर-गोवा प्रवास होणार सुसाट; एक्सप्रेस वे मुळे विकासाला येणार वेग

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group