नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी झाले आहेत. त्यांनी पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. याद्वारे महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे. नागपूर हा भाजप नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जातो. आणि तेथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. आडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळविला आहे. आता नागपुरात महाविकास आघाडीने खाते उघडले आहे. आडबाले हे वाशिमचे आहेत. राज्यात विधान परिषदेच्या एकूण ५ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात एक जागा भाजपला आणि एक जागा काँग्रेसला मिळाली आहे. उर्वरीत नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या तीन ठिकाणची मतमोजणी सुरू आहे. अद्याप तेथील कल स्पष्ट झालेला नाही.
नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबाले विजयी,
काही दिवसापूर्वी पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी विजयी..
भाजपाचे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस व बावनकुळे मुनगंट्टीवार भाजपा चे दिग्गज नेत्यांचे वर्चस्व असलेल्या नागपूर व पुर्व विदर्भात भाजपाचा पराभव कसा वाटतो @BhatkhalkarA …???
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 2, 2023
Nagpur Teachers Constituency Election Counting