India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नागपुरात ईडीचे तब्बल १७ ठिकाणी छापे; यांच्या कार्यालयांची झाडाझडती

India Darpan by India Darpan
March 4, 2023
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना गंडा घालणाऱ्या पंकज नंदलाल मेहाडिया आणि त्याच्याशी संबंधित सुमारे सतरा ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर आणि मुंबई शाखेने गुरुवारी छापे टाकलेत. प्राप्त माहितीनुसार, यामध्ये आर संदेश ग्रुपचे रामदेव उर्फ रामू अग्रवाल, संजय अग्रवाल, अनिल पारख, लोकेश जैन, शैलेंद्र अग्रवाल, सनविजयचे संचालक संजय अग्रवाल, सुरेश बाजोरिया आणि मुंबई येथील विनोद गर्ग यांचे निवासस्थान आणि कार्यालयाचा समावेश आहे.

पंकज मेहाडिया याच्याविरुद्ध यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार मेहाडिया याला अटक करण्यात आली होती. मागील सहा महिन्यांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करीत आहे. दरम्यान, हा घोटाळा पाचशे कोटींहून अधिकचा असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील काळा पैसा (गैरमार्गाने कमविलेली संपत्ती) गुंतवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जवळपास पन्नासहून अधिक जणांच्या चमूने गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून सुरू केलेली कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. रामू अग्रवाल यांचे रामदासपेठेतील गौरी हाइट्स हे निवासस्थान, संदेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय, संजय अग्रवाल यांच्या सनविजय कंपनीचे ग्रेट नाग रोडवरील कार्यालय तसेच सदर आणि रामदासपेठेतील संलग्नित प्रतिष्ठानांवर छापेमारी करण्यात आली. कारवाईदरम्यान प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. यामध्ये काही चार्टर्ड अकाउंटंट्सचाही समावेश असून त्यांच्याही कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

स्टील, लोह उद्योगातील भागीदारही रडारवर
पंकज मेहाडियाशी संबंधित स्टील, लोह, कोळसा, बांधकाम, हवाला उद्योगातील त्याचे सहकारी आणि भागीदार ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या संदर्भात ईडीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Nagpur ED 17 Places Raid Real Estate Traders


Previous Post

‘आता आम्हाला इच्छामरण तरी द्या!’, संकटग्रस्त कांदा उत्पादकांची राष्ट्रपतींकडे मागणी

Next Post

सप्तशृंगगडावरील देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; असे झाले उघड

Next Post

सप्तशृंगगडावरील देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; असे झाले उघड

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group