नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे लक्ष नाही सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल अजित पवार यांनी केला. दरम्यान या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
https://twitter.com/amolmitkari22/status/1605594562487009280?s=20&t=WCU_kHAm_cNsT288tgqHaw
Nagpur Aamdar Nivas Toilet Video CM Order