मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र व राज्य सरकारपाठोपाठ आत मुंबई महापालिकेनेही रिक्त जागा भरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी) पदासाठी २७ रिक्त जागा भरायच्या आहेत. यानिमित्ताने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. दहावी पास असाल आणि टायपिंग येत असेल तर वाट कसली बघताहेत. त्वरा करा, तातडीने अर्ज भरा.
पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदांची माहिती, पात्रता निकष व अर्ज करण्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. ज्युनिअर स्टेनोग्राफर वृत्तनिवेदक (इंग्रजी) च्या एकूण ९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे इंग्रजी टायपिंगचा वेग ४० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी शॉर्टहॅण्डचा ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे.
ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टरची १८ पदे
ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी) च्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे मराठी टायपिंगमध्ये ३० शब्द प्रति मिनिट आणि मराठी शॉर्टहॅण्डचा ८० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे.
MSCIT प्रमाणपत्र आवश्यक
दोन्ही पदांसाठी उमेदावरी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांकडे एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट १८ ते ३८ वर्षे असून मागासवर्गीय प्रवर्गातील १८ ते ४३ वर्षे वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल. महानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक १००, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई- ४००००१ या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अधिकमाहितीसाठी http://www.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
Mumbai Municipal Corporation BMC Recruitment Vacancy