इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय दर्जेदार वृत्तसेवा देणाऱ्या इंडिया दर्पणच्यावतीने वाचकांच्या आग्रही मागणीस्तव आता नवे सदर सुरू करण्यात आले आहे. वास्तू शंकासमाधान या सदराद्वारे वाचकांना आता विविध प्रकारचे अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. गृहस्वप्न पूर्ण होणे ही फार मोठी बाब असते. मात्र, कुठली वास्तू घ्यावी, कशी असावी, वास्तूशास्त्र काय सांगते, आपल्या राहत्या घरातील अनेक बाबी कशा असाव्यात, काही समस्या असतील तर त्या कशा दूर कराव्यात आदींविषयी आता शास्त्रोक्त माहिती दिली जाणार आहे.
वास्तू तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य प्रशांत सुधाकर चौधरी हे या सदराद्वारे वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २१ वर्षांपासून ते ज्योतिष आणि वास्तूशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्योतिष भूषण आणि वास्तू विशारद या पदवी त्यांनी संपादित केल्या आहेत. त्याशिवाय ते गृहरक्षक दलातही सेवा बजावत आहेत. नाशिकच्या ज्योतिष अभ्यास मंडळात ते शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वैवाहिक, घरगुती समस्या,अडचणी समुपदेशक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीत ते जनकल्याण रुग्नोपयोगी साहित्य केंद्राचे सहप्रमुख आहेत. त्याशिवाय नाट्य कला क्षेत्रात नैपथ्यकार, लहान व तरुण मुलांनमध्ये संस्कार वर्ग आयोजन, भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक ग्रामीण यांच्याकडूनही त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. “कोरोनायोद्धा” म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.
या आठवड्याचा प्रश्न असा
आपल्या वाचकांपैकी महादेवजी आणि किरणजी तसेच अनिलजी यांनी जिन्याच्या पायऱ्यांविषयी विचारले आहे
घराची फ्लोरिंग आणि घराचा उतार कसा असावा
उत्तर – जिना हा नेहमी दक्षिण पश्चिम या दिशेला हवा. त्याचप्रमाणे शक्यतो ईशान्य कोपरा आणि ब्रह्म स्थानांमध्ये टाळावा. जर चुकून जिना उत्तर आणि पूर्व मध्ये आला तर बाकीची वास्तू ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर त्याचा त्रास होत नाही. सर्वात उत्तम पश्चिम आणि दक्षिण या दिशा जिन्यासाठी अतिशय उत्तम जागा आहे. जिना बांधताना तो नेहमी सुलट दिशेनेच बांधावा. म्हणजेच क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज जिन्याच्या पायऱ्या नको. पायऱ्या या नेहमी उतरताना उत्तर दिशेकडे व पूर्व दिशेकडे असाव्यात. पायऱ्या बांधताना किंवा तो कोणत्या दिशेस लावावा यासाठी बरेचसे नियम असतात. आणि ते सगळं येथे सांगणे शक्य नाही. पण किमान वरील नियमांचे पालन करावे. त्याद्वारे आपला त्रास कमी होऊ शकतो. जिन्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो, यात शंका नाही.
वास्तूविषयी आपले प्रश्न या नंबरवर व्हॉटसअॅप करावेत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
ज्योतिष व वास्तू अभ्यासक
मो. – 9850281917
वरील नंबरवर कॉल करु नये. आपले प्रश्न फक्त व्हॉटसअॅप करावेत. आपले पूर्ण नाव आणि पत्ताही द्यावा. आपल्या प्रश्नांना इंडिया दर्पण शंकासमाधान या सदरामध्येच उत्तर दिले जाईल.

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
India Darpan Vastu Shanka Samadhan Stairs by Prashant Chaudhari
Answer