India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भर समुद्रात बोटीमध्ये अडकले मंत्री उदय सामंत; अखेर अशी झाली सुटका

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in मुख्य बातमी
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत स्टाफसह बोटीतून मुंबईकडे येण्यासाठी निघाले. पण, भर समुद्रात बोटच बंद पडली आणि सारेच अडकून पडले. बोटीतील सर्वजण चिंतेत असतानाच सोबत असलेल्या पीएच्या प्रसंगावधानाने उदय सामंत यांच्यासह संपूर्ण स्टाफ सुखरूप मुबईला पोहोचले.

हा संपूर्ण थरारक घटनाक्रम शुक्रवारी सायंकाळी मुंबईच्या समुद्रात घडला. सामंत हे अलिबाग येथील कार्यक्रम आटोपून रायगड जिल्ह्यातील मांडवा येथून स्पीड बोटीने मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाले. बोटीने प्रवास करत असताना भर समुद्रातच स्पीड बोट बंद पडली. बोटीची सर्वच यंत्रणा ठप्प झाली होती. बोटीच्या कॅप्टनला मदतीसाठी आपत्कालीन संदेश पाठवणेही शक्य होत नव्हते. लाटांमुळे सामंत यांची बोट भरकटू लागली होती. प्रसंगावधान राखत सामंत यांच्या पीएंनी प्रयत्न सुरू केले. मोबाइलला रेंज नसली तरी ते सातत्याने प्रयत्न करीत होते. अनपेक्षित पणे, काहीशी रेंज मिळाली आणि त्यांनी मदत मागविली.

जीव भांड्यात
काही वेळातच कशीबशी दुसरी बोट आली आणि सामंतांसह त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यात शिफ्ट झाला. त्यानंतर सर्वजण बोटीतून सुखरूप मुंबईत पोहोचले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. यासोबतच बुडणाऱ्या बोटीलाही वाचवण्यात आले. सध्या या घटनेची आणि पीएंच्या प्रसंगावधानाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Mumbai Minister Uday Samant Stuck in Sea Boat


Previous Post

न्यायालयाने हिसका दाखवताच विधानसभा अध्यक्षांसह मंत्री थेट हजर; नेमकं काय घडलं?

Next Post

‘हाई झुमका वाली पोर’नं लावलं याड! धरणगावातील विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Next Post

‘हाई झुमका वाली पोर’नं लावलं याड! धरणगावातील विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगचा व्हिडिओ तुफान व्हायरल

ताज्या बातम्या

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group