गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; ही आहे मागणी (व्हिडिओ)

नोव्हेंबर 17, 2022 | 5:17 pm
in राज्य
0
Capture 13

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील मंत्रालय हे जणू काही आपल्याला न्याय मिळण्याचे ठिकाण आहे, अशी सर्वसामान्य राज्यभरातील जनतेची समजूत असते. त्यामुळे कोणतेही समस्या किंवा अडचण असेल तर लगेच काहीजण मंत्रालय गाठतात आणि न्यायाच्या मागणीसाठी मंत्री आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्या कक्षाकडे धाव घेतात. मंत्रालयात जातात आणि आपल्याला न्याय मिळत नाही अशा नैराश्यातून थेट आत्महत्याचे पाऊल उचलतात. मंत्रालयात आज गुरूवार दि. १७ नोव्हेंबर रोजी देखील अशीच एक भयानक घटना घडली. एका तरुणाने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रेयसी वर अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याने न्याय मागण्यासाठी एका तरुणाने मंत्रालय गाठले. गेल्या तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा यासाठी प्रियकराचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि आपल्याला न्याय मिळत नाही या भावनेतून त्याने चक्क मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ही घटना समजताच सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन त्याला अडविले, परंतु या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अशाच प्रकारच्या घटना गेल्या काही वर्षात घडत असल्याने या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच मंत्रालयातील अनेक मजल्यावर संरक्षक जाळ्या देखील लावण्यात आल्या आहेत. तरीही देखील असे प्रकार घडत असल्याने वरिष्ठ पातळीवरून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी येथील बापू नारायण मोकाशी (वय ४३) या तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर पडला. त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मागील काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. त्यानिमित्ताने मंत्रालयात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच अचानकपणे बापू मोकाशी यांनी आपल्या मागण्यांवर कार्यवाही होत नसल्याने उडी मारली. या तरुणाने उडी मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. मंत्रालयातील पोलिसांनी तात्काळ सुरक्षा जाळी असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पडल्यानंतरही बापू मोकाशी काही वेळ तिथेच रेंगाळत होते. त्याच दरम्यान त्यांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. या दरम्यान पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते सुरक्षा जाळीवरून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही वेळ पोलिसांनी त्याची विचारपूस केली आणि ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे. मागील काही दिवसातील ही दुसरी घटना असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

https://twitter.com/priyarajputlive/status/1593189142649004032?s=20&t=y1IYvdiNWXHuKYa6PGPqvg

मागील काही महिन्यांपासून मंत्रालयात सामान्यांची गर्दी वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने काही नियम लागू केलेत. ऑगस्ट महिन्यात झालेल्या विधीमंडळ अधिवेशना दरम्यान मंत्रालयात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मंत्रालयाच्या टेरेसवर चढून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरुप खाली उतरवले होते. त्याचप्रमाणे जानेवारी २०१८मध्ये मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला होता. पाटील यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या धर्मा पाटील यांनी त्यावर्षी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.

फेब्रुवारी २०१८ अहमदनगरमधील अविनाश शेटे ( वय २५ ) या तरुणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारावा लागत होत्या म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच फेब्रुवारी २०१८मध्येच मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी घेत चेंबूर येथील रहिवाशी असलेल्या हर्षल रावते या ४४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा कमी व्हावी यासाठी तो मंत्रालयात आला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली होती.

Mumbai Mantralay Youth Suicide Attempt

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतात मोटर चालू करतांना शेतक-याचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Next Post

खळबळजनक! मद्यधुंद कारचालकाचा नाशकात थरार; रस्त्यावर अनेकांना चिरडले, संतप्त जमावाने पकडले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
breaking news

खळबळजनक! मद्यधुंद कारचालकाचा नाशकात थरार; रस्त्यावर अनेकांना चिरडले, संतप्त जमावाने पकडले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011