मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील कंक्राळे शिवारातील विनोद कन्नोर हा रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरण्यासाठी गेलेला असतांना मोटर चालू करीत असतांना विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिवसा विज उपलब्ध होत नाही. त्यामुळे रात्री वीज आल्यावर रात्रीचे पाणी भरण्यास जाण्याची वेळ येते. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीने दिवसा विद्युत पुरवठा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.