शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद बाविस्कर राज्यस्तरीय पुरस्कार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मुंबईत वितरण

जानेवारी 5, 2023 | 10:10 pm
in स्थानिक बातम्या
0
New Doc 2018 06 10 2 1 e1672936790224

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘अप्रतिम मीडिया’च्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या ’चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत, ‘अप्रतिम मीडिया’च्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिले जाणारे ‘ चौथास्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार २०२२’चे विजेते घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील मराठी भाषेतील विविध माध्यमात विकास पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अप्रतिम मीडिया या संस्थेमार्फत गेली १० वर्षे ‘चौथा स्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

विशेष म्हणजे हे सर्व पुरस्कार जनमत चाचणी घेण्यात येऊन त्या आधारे दिले जातात. या वर्ग वारीतील पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साहित्य संवाद वृत्त गटातून सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार पत्रकार दिनी म्हणजेच शुक्रवार, दि. ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पाँईट, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाचे पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे आहेत.
जीवन गौरव -प्रकाश नथुजी कथले (वर्धा ), हेमंत जोशी (मुंबई ) योगेश त्रिवेदी ( मुंबई ).
१ ) टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर – आशुतोष पाटील, (संपादक, न्यूज१८ लोकमत, मुंबई ).
२ ) माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व – मदन चंद्रभान काळे (शिरूर, जि. पुणे (संवाद लाईव्ह टीव्ही, साप्ताहिक संवाद वाहिनी).
३ ) साहित्य संवाद गट -मुकुंद अर्जुनराव बाविस्कर (नाशिक-मुक्त पत्रकार)
४ ) पर्यावरण वृत्त गट – प्रशांत सिनकर (ठाणे,महाराष्ट्र टाईम्स), महेश दिगंबर जोशी (औरंगाबाद, दिव्यमराठी) व दिनकर शिंदे ( गेवराई, जि.बीड – पार्श्वभूमी)
६ ) वने व इको टूरिझम वृत्त – अरुण तम्मडवार ( किनवट, जि. नांदेड – पुढारी) व श्यामकुमार पुरे ( सिल्लोड – लोकमत) आणि राजेंद्र आसाराम भोसले, कन्नड, जि.औरंगाबाद (मुक्त पत्रकार)
७ ) विकास वृत्त – शाश्वत गुप्ता रे ( पणजी, गोवा -मुक्त पत्रकार) व विलास ओव्हाळ ( पणजी, गोवा पुढारी)
८ ) स्थानिक पर्यटन वृत्त – मकरंद मधुकर जाधव ( श्रीवर्धन, जि.रायगड – दैनिक वादळवारा) व नितीन मोरे ( कंधार, जि.नांदेड – आदर्शगावकरी) आणि दादासाहेब घोडके, पैठण (एमसीएन न्यूज)
९ ) उद्योग / व्यापारवृत्त – चंद्रन महादेवन अय्यर, पुणे (मासिक कार्पोरेट टायकून्स)
१० ) कला-संस्कृती वृत्त गट – श्रीकांत गोपाळराव सराफ ( औरंगाबाद – दिव्य मराठी)
११ )कृषी वृत्त – राहुल दत्तात्रय कुलकर्णी, गंगापूर(सकाळ – अग्रोवन) व पूनम सुनील सकपाळ ( नवी मुंबई , लोकसत्ता) व सदाशिव खेमचंद फुले, ( सिल्लोड – दिव्य मराठी) आणि विजय एकनाथराव चौधरी ( खुलताबाद, महाराष्ट्र टाईम्स)
१२ ) शैक्षणिक वृत्त – महालसिंग भिसे ( गंगाखेड, जि.परभणी – दैनिक लोकप्रश्न) व विजय कुलकर्णी ( परभणी – दैनिक लोकनेता)
१३ ) आरोग्य वृत्त – जान्हवी प्रसाद पाटील, ठाणे (महाराष्ट्र टाईम्स) व रमाकांत फकीरा पाटील ( नंदुरबार, लोकमत) व फिरोज बशीर पिंजारी ( खोपोली, दैनिक कोकण प्रजा) आणि मनीषा अभिजीत हिरप( औरंगाबाद –
मासिक -हेल्दी सोसायटी)
१४ ) ग्रामीण विकास वृत्त – नवनाथ गोपीनाथ इधाते ( फुलंब्री, जि.औरंगाबाद -सकाळ) व उमेश रमेश अलोणे ( अकोला, विदर्भ -एबीपी माझा) आणि विश्वास आरोटे ( अकोले जि.अहमदनगर – दैनिक गावकरी) आणि
सुनील ढेपे, (उस्मानाबाद -उस्मानाबाद लाइव्ह डॉट काम)
१५ ) सहकार वृत्त – शफिक मोहम्मद बागवान ( श्रीरामपूर, दैनिक राष्ट्र सह्याद्री) व सिद्धेश्वर केशुबा गिरी ( सोनपेठ , दैनिक एकमत)
१६ ) पत्रकारिता अध्यापन गट – डॉ. संध्या मोहिते, औरंगाबाद (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ )
१७ ) स्थानिक विकास वृत्त – कन्हैया सत्यनारायण खंडेलवाल ( हिंगोली – एन डी टीव्ही ) व पल्लवी राजेंद्र नाईक, ( सोलापूर, ९२.७ बिग एफएम) आणि मकरंद बांगर, हिंगोली (मुक्त पत्रकार)
१८ ) राजकीय वृत्त – उन्मेष गुजराथी ( मुंबई – स्प्राउटस डॉट कॉम) व भास्कर लोंढे ( नागपूर – लोकशाही वार्ता) व प्रकाश दयाराम हांडे (न्युज ३४, चंद्रपूर ) सचिन सुहासराव काटे ( हैद्राबाद – इटीव्ही भारत)
१९ ) सामाजिक वृत्त – देवेंद्र त्रिंबकराव भुजबळ ( पुणे, न्यूज स्टोरी टुडे) व सचिन रावसाहेब बडे ( औरंगाबाद लोकशाही टीव्ही)
२० ) शासकीय योजना वृत्त – मोसिन शेख (मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद )
२१ ) स्थानिक स्वराज्य संस्था वृत्त – उन्मेष देशपांडे ( औरंगाबाद, महाराष्ट्र टाईम्स) व मनोज कुलकर्णी ( नाशिक – टीव्ही ९) व कैलास उत्तम ढोले, अहमदनगर,(मुक्त पत्रकार)
२२ )युवा क्षेत्र वृत्त – हरीश राजेंद्र शर्मा ( औरंगाबाद , सकाळ)
२३ ) धार्मिक क्षेत्र वृत्त – हनुमंत चिटणीस, पाथरी, जि.परभणी (मुक्त पत्रकार)
२४ ) आर्थिक वृत्त – विलास माणिकराव बडे ( मुंबई, न्यूज १८ टीव्ही) व अनिकेत अरविंद पेंडसे ( मुंबई, लोकमत ऑनलाईन)
२५ ) गुन्हेगारी वृत्ते – नरेश डोंगरे (नागपूर , लोकमत)
२६ ) प्रेस फोटोग्राफी – रवी खंडाळकर व मनोज पराती (दिव्य मराठी) आणि विजय भावसार ( नांदगाव, जि.नाशिक )
२७ ) ग्राफिक डिझाईनिंग पत्रकारेतर गट – महेश सोनाजी विसपुते (औरंगाबाद ).
आदिंची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या माध्यम प्रतिनिधींचे नामांकन करण्यात आले होते. त्यात २०२०-२०२१ या दोन वर्षांमध्ये केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण आणि पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष पुरस्कारासाठी लावण्यात आले होते. त्यानुसार विविध वृत्त गटातून पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका सौ.प्रीतम फळे, निमंत्रक विवेक देशपांडे, रणजीत कक्कड यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आज वाद टाळावा; जाणून घ्या शुक्रवार, ६ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – त्यालाच हे सामर्थ्य लाभते

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - त्यालाच हे सामर्थ्य लाभते

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011