पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढत्या वीज बिलामुळे तुम्ही त्रासले असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे वीज बिलात तुम्हाला चक्क ५५० रुपयांची सूट मिळू शकते. ही कुठल्याही वीज उपकरणाची जाहिरात नाही तर थेट महावितरण कंपनीचीच योजना आहे,. ही योजना नेमकी काय आहे, तिचा लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे आदी बाबी आपण आता जाणून घेणार आहोत…
भारत सरकार उर्जेच्या पारंपारिक स्त्रोतांऐवजी पर्यायी स्त्रोतांवर जास्त भर देत आहे. सरकारला डिझेल-पेट्रोलचा वापर कमी करून आयातीवरील खर्च कमी करायचा आहे. याचा देशाला परकीय चलनाच्या साठ्याच्या दृष्टीने फायदा तर होईलच, पण पर्यावरण रक्षणासाठीही मदत होईल. हे लक्षात घेऊन 2030 पर्यंत अपारंपरिक पद्धतीने 40 टक्के वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे.
सरकारनं या वर्षाच्या अखेरीस सौर उर्जेपासून 100 GW वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं आहे, त्यापैकी 40 मेगावॅट वीज छतावर सौर पॅनेल बसवून निर्माण करण्याचं नियोजन आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानही देत आहे.महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे सौर रुफटॉप योजना आहे.
सध्या आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मिती साठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना राबविण्याचा विचार केला आहे.
या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान १ किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा २ अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.
ही योजना नागरिकांसाठी अनेक बाबतीत फायदेशीर आहे. सर्वप्रथम, या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसविण्याचा खर्च कमी आहे, कारण त्यातील काही भाग सरकारकडून अनुदानाच्या रुपात दिला जाणार आहे. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारेही त्यांच्या वतीनं अतिरिक्त अनुदा देत आहेत. दुसरीकडे सोलर पॅनल बसवल्याने वीज बिलाचा त्रास कायमचा संपतो. तुमच्या घरातील दैनंदिन वापरासाठी लागणारी वीज छतावरील सोलर पॅनेलमधूनच तयार केली जाते. त्याचा तिसरा फायदा म्हणजे या योजनेत कमाईच्या संधी आहेत. घराच्या छतावरील सोलार पॅनल्स तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीज बनवत असतील तर वीज वितरण कंपन्या तुमच्याकडून ती विकत घेतील.
सध्या महावितरणची मोठी स्कीम सौर रुफटॉप यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा ५५० रुपयांची बचत होईल. यंत्रणा उभारणीच्या खर्चाची ३ ते ५ वर्षात परतफेड होईल. १०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर ५५० रुपये वाचवता येतील.
सौर रुफटॉप योजने अंतर्गत आलेल्या अर्जांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ग्राहकाला याचा लाभ घेता येईल, असे नियोजन प्रत्येक उपविभागीय कार्यालयाने करावे. या कामात हयगय करणाऱ्या एजन्सींवर, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा देतानाच प्रलंबित अर्जांवर कारवाई करा आणि ग्राहकांना मीटर उपलब्ध करून द्या, असे आदेश महावितरणचे प्रकल्प संचालक यांनी रुफटॉप सौर ऊर्जाबाबत घेतलेल्या बैठकीत दिले.
छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होते तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज विकत घेतली जाते. तसेच हाऊसिंग सोसायटीस व अशा इतर ठिकाणी शिबिर घेऊन योजनेबाबत माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे. झोपडपट्टी असलेल्या भागात जनजागृती केल्यास वीज बिल कमी येईल. ग्राहकांना फायदा होईल. घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून वित्त साह्य देण्यात येणार आहे.
MSEDCL Scheme Electricity Bill 550 Rs Discount
Mahavitaran Solar Roof Top MSEB