शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या; आता कुठल्याही क्षणी अटक होणार?

डिसेंबर 22, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
navneen rana

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहमीच वादात आणि चर्चेत असलेल्या अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जात पडताळणी प्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत राणा यांच्या खासदारकी विषयीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राणा यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळत दणका दिला आहे. नवनीत राणा यांनी दोषमुक्ततेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. यामुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. Tया प्रकरणी नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांनी त्यांच्या विरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून दोषमुक्ती करण्यात यावी, याकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. यावर सुनावणी झाली. न्‍यायालयाने त्‍यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्याचप्रमाणे महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने हा निर्णय योग्यच असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. नवनीत राणा यांना महानगरदंडाधिकारी न्यायालयात हजर राहावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, जात प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. ऑक्टोबर महिन्यात न्यायालायने या दोघांविरुद्ध दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट बजावला होता.
खरे म्हणजे नवनीत राणा यांचा रवी राणा यांच्याशी सन २०१३ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. त्याची पडताळणी देखील करण्यात आली होती. मात्र या प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी सन २०१७ मध्ये याचिका दाखल केली. या याचिकेमुळे न्यायालयाने जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय दिला होता.

दरम्यानच्या काळात नवनीत राणा यांनी या जात प्रमाणपत्राच्या आधारे सन २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणूकीत राणा विजय मिळवत शिवसेनेचे अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली. हेच प्रमाणपत्र रद्द करण्‍यात आल्‍याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दि. ८ जून २०२१ रोजी दिला होता.
महत्वाची गोष्ट अशी की, राणा या ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतु राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात पुढे काय होते याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.

MP Navneet Rana in Trouble Mumbai High Court
Politics Amravati Caste Validity Certificate

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा आहे जगाचे किचन… बघा, जगभरात काय काय होतेय निर्यात… आता फक्त याचीच आहे गरज…

Next Post

अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रचंड भडकली, पण का? विराटने याच कंपनीद्वारे कमावले कोट्यवधी रुपये

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
virat anushka 1

अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रचंड भडकली, पण का? विराटने याच कंपनीद्वारे कमावले कोट्यवधी रुपये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011