गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माझी इच्छा आहे, एक दिवस हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान व्हावी – असदुद्दीन ओवेसी

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2022 | 3:34 pm
in राष्ट्रीय
0
owaisi

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विभागले गेले आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे, मात्र याचदरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ओवेसी म्हणाले, ‘जेव्हा मी म्हणतो की, एक दिवस या देशाचा पंतप्रधान हिजाब परिधान करणारा होईल, हे माझे स्वप्न आहे, तेव्हा अनेकांची डोकेदुखी आणि पोटदुखी होते. मी असे का म्हणू नये? हे माझे स्वप्न आहे. काय चुकीचं आहे त्यात. पण तुम्ही म्हणता की हिजाब घालू नये. मग मी काय घालावे? बिकिनी? तुम्हालाही ते घालण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मुलींनी हिजाब घालू नये आणि मी दाढी काढावी असे तुम्हाला का वाटते?

ओसेवी म्हणाले की, मुस्लिम मुलीने हिजाब घातला तर त्याचा अर्थ तिच्यात बुद्धी कमी आहे असे नाही. आपण लहान मुलींना हिजाब घालायला भाग पाडतो, खरंच मुलींवर जबरदस्ती करतोय का? तुम्ही हैदराबादमध्ये आलात तर तुम्हाला दिसेल की येथील सर्वात बदनाम ड्रायव्हर आमच्या बहिणी आहेत. त्यांच्या मागे गाडी घेण्याची जोखीम कोणीही घेऊ शकत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी माझ्या ड्रायव्हरला सावधपणे गाडी चालवण्यास सांगितले आहे. तुम्ही मुलीच्या बाईकच्या मागे बसा आणि मग बघा त्यांच्यावर काही दबाव येतो का.

ओवेसी म्हणाले की, आमच्यावर आरोप केले जात आहेत की आम्ही मुलींवर दबाव आणतो. शेवटी आजच्या जगात कोण कोणाला घाबरतो? त्यांनी पुन्हा एकदा हिजाबची तुलना हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांच्या प्रतीकांशी केली. जेव्हा हिंदू, शीख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्या चिन्हांसह प्रवेश दिला जातो, तेव्हा मुस्लिमांना का रोखले जाते, असे ते म्हणाले. असे झाले तर ते मुस्लिमांबद्दल काय विचार करतील. त्यांना एकच संदेश जाईल की मुस्लिम आमच्या खाली आहेत.

यावर भाजप नेते सीटी रवी म्हणाले की, ओवेसी हे अतिरेक्याचे समर्थन करतात, जे भारतात चालणार नाही. ‘मला ओवेसींना विचारायचे आहे, तुम्ही कुराणाच्या नावावर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तालिबानला पाठिंबा देता का? अल्लाहच्या नावाने दहशतवाद वाढवणाऱ्या लादेनचे तुम्ही समर्थन करता का? अल्लाहच्या नावाखाली अनेक लोक दहशतवाद वाढवत आहेत, पण भारतात तो होऊ दिला जाणार नाही.

MP Asaduddin Owaisi on Hijab Controversy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माझा जीव धोक्यात असला तरी मी घाबरणार नाही, माझं ५ वर्षांचं बाळही शिवसेनेला दत्तक – सुषमा अंधारे

Next Post

महिलेचा घरमालक असलेला बापलेकाने केला विनयभंग; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

महिलेचा घरमालक असलेला बापलेकाने केला विनयभंग; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011