पुणे – मोटोरोलाने मोटो G51 हा 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीचा देशातील सर्वात परवडणारा 5G फोन आहे. अधिक चांगली कनेक्टिव्हिटी अनुभव देण्यासाठी हा फोन ग्लोबल 5G बँकसह देण्यात येणार आहे. येत्या १६ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या सेलमध्ये तो उपलब्ध होऊ शकेल.
या स्मार्टफोन मध्ये 120Hz डिस्प्ले आणि मागे ट्रिपल कॅमेरे आहेत. मोटो G51 या स्मार्टफोनची स्पर्धा Redmi Note 10T आणि Realme Narzo 30 5G शी आहे. तसेच मोटो G51 हा 5G फोन भारतात केवळ 14 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. यात 4GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेल देण्यात येते. हा फोन एक्वा ब्लू, ब्राइट सिल्व्हर आणि इंडिगो ब्लू कलरमध्ये उपलब्ध असेल.
सदर फोनची विक्री 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. गेल्या महिन्यात, मोटा G51 5G युरोपमध्ये अंदाजे रुपये 19,700 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मोटो G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच फुल एचडी+मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे. हे My UX वर अॅण्डरॉईड 11 वर चालते. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस SoC आहे, 4 GB रॅम सह आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये F/1.8 लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह 50 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. यामध्ये F/2.2 लेन्स आहे. या फोनचे एकूण वजन 208 ग्रॅम आहे.