रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘जास्त हुशारी दाखविण्याची गरज नाही’, मोरबी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने गुजरात सरकारला फटकारले

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 15, 2022 | 4:45 pm
in संमिश्र वार्ता
0
FgVgsI1agAECqkm

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  मोरबी पूल दुर्घटनेबाबतच्या जनहित याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. निविदा काढताना आढळलेल्या त्रुटींबद्दल राज्य सरकार आणि मोरबी महापालिकेला यावेळी न्यायालयाने फटकारले. मोरबी नगरपालिकेने हुशारी दाखवण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने १५ जून २०१६ रोजी कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतरही नवीन निविदा का काढण्यात आली नाही? निविदा नसलेल्या व्यक्तीबाबत राज्याने किती औदार्य दाखवले? राज्याने नागरी संस्थेच्या मुख्य अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई का सुरू केली नाही याचे कारण स्पष्ट करावे, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी
आपल्या कुटुंबातील एकमेव कमावणारे पण अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्याला आधार म्हणून नोकरी दिली जाऊ शकते का, हेही खंडपीठाने राज्य सरकारकडून जाणून घेण्यास सांगितले. त्याचवेळी, संबंधित कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी केली जात असल्याचे राज्य मानवी हक्क आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

पुढील सुनावणी 
आता या प्रकरणावर उच्च न्यायालयात पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. खंडपीठाने विचारले की, पहिल्या कराराची मुदत संपल्यानंतर कंत्राटदाराला कोणत्या आधारावर पूल चालवण्याची परवानगी देण्यात आली? दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान या प्रश्नांची उत्तरे प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नियमाचे पालन
महाधिवक्ता कमल त्रिवेदी यांनी सांगितले की, दुरुस्तीच्या कामाची माहिती प्राधिकरणाला न देता २६ ऑक्टोबर रोजी खासगी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी हा पूल खुला केला. पुलाच्या क्षमतेबाबत किंवा फिटनेसबाबत थर्ड पार्टी प्रमाणपत्र दिलेले नाही, असे ते म्हणाले. ओरेवा ग्रुपने फॅब्रिकेशनचे काम देवप्रकाश सोल्युशन्सकडे सोपवले होते. त्रिवेदी म्हणाले, ‘दिवाळी असल्याने ३० ऑक्टोबरला खूप गर्दी होती. दिवसभरात ३१६५ पर्यटकांनी भेट दिली. पुलावर केवळ ३०० लोकांना येण्याची परवानगी होती मात्र त्याचे पालन झाले नाही.

अहवाल मागवला
सरन्यायाधीश अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या अनुपलब्धतेमुळे सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. न्यायमूर्ती कुमार आणि न्यायमूर्ती आशुतोष शास्त्री यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि राज्य मानवाधिकार आयोगाला ७ नोव्हेंबरला नोटीस बजावली आणि ३० ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेबाबत सरकारकडून स्थिती अहवाल मागवला.

१३५ जणांचा मृत्यू 
३० ऑक्टोबर रोजी मोरबी येथील मच्छू नदीवरील ब्रिटीशकालीन झुलता पूल कोसळून महिला आणि मुलांसह १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी सांगितले की, पूल कोसळण्याच्या घटनेच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे आणि जनहित याचिका म्हणून नोंद केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी मोरबी पुलाचे व्यवस्थापन करणाऱ्या ओरेवा ग्रुपच्या ४ जणांसह ९ जणांना अटक केली आणि पुलाच्या देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Morbi Bridge Accident Gujrat High Court

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच; तीन दुचाकी चोरीला

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत या तारखेला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत या तारखेला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011