नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी,नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना मुक्तीधाम भागात घडली. सचिन विष्णू डावरे (रा.पंचक,शिवरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डावरे सोमवारी (दि.१४) मुक्तीधाम परिसरात गेले होते. स्टार मॉल भागातील अस्सुरेड केअर प्लस हॉस्पिटल परिसरात त्यांनी आपली युनिकॉर्न एमएच १५ ईक्यू ६२९५ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत. दुसरी घटना गोदाघाटावर घडली. मखमलाबाद येथील विठ्ठल भगवान सोनवणे (रा.गामणे मळा,म.बाद) हे गेल्या शनिवारी (दि.१२) गोदाघाटावर आले होते. कपालेश्वर मंदिर भागात त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ सीएच ८२९३ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत. तिसरी घटना जेलरोड भागात घडली. संजय विठ्ठलराव कुमावत (रा.रिव्हराईन नेस्ट अपा.ओमनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुमावत शनिवारी (दि.१२) रात्री किरणा खरेदी करण्यासाठी जेलरोड येथील जागृतीनगर भागात गेले होते. इच्छामणी किराणा दुकानासमोर आपली अॅक्टीव्हा एमएच १५ डीपी ६५२९ पार्क करून ते दुकानात गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कुºहाडे करीत आहेत.