पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल फोन वापरणे ही जणू काही काळाची गरज बनली आहे, कारण स्मार्टफोन हे केवळ संपर्क माध्यम न राहता त्याद्वारे आपण ऑनलाईन आर्थिक व्यवहार देखील करू शकतो. परंतु दुर्दैवाने किंवा काही अपरिहार्य कारणामुळे आपला फोन हरवला तर सर्वांनाच मोठी चिंता लागते. कारण या फोनचा गैरवापर होऊन आपले आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.
आता काळजी करण्याची गरज नाही कारण गुगल पे, पेटीएम फोन पे यासारख्या आपल्या या सेवा आपण तात्काळ बंद करू शकतो तुमच्या फोनमध्ये PhonePe, Google Pay आणि Paytm लॉगिन सारखी UPI आधारित पेमेंट सेवा आहे. त्यामुळे कोणीतरी त्याचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, चोरी झालेल्या फोनमध्ये तुम्ही तुमची सर्व UPI आधारित सेवा बंद करू शकता. त्याची पद्धत अगदी सोपी आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…
पेटीएम
पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन क्रमांक 01204456456 वर कॉल करा. त्यानंतर फोन हरवण्याचा पर्याय निवडा. वेगळा नंबर टाकण्याचा पर्याय निवडा आणि तुमच्या हरवलेल्या फोनचा नंबर टाका. त्या नंतर सर्व उपकरणांमधून लॉग आउट करणे निवडा. नंतर पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 मदत निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा. फसवणूक नोंदवा निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.
त्यानंतर कोणत्याही समस्येवर क्लिक करा आणि नंतर तळाशी असलेल्या Message Us बटणावर क्लिक करा. यानंतर, वापरकर्त्याला डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खाते शोधावे लागेल. त्यानंतर पेटीएम तुमचे खाते शोध करेल आणि ब्लॉक करेल.
गुगल पे
Google Pay वापरकर्ते हेल्पलाइन नंबर 18004190157 वर कॉल करू शकतात. येथे वापरकर्त्याला त्याच्या पसंतीची भाषा निवडण्याचा पर्याय असेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे Google Pay खाते ब्लॉक करण्यासाठी तज्ञ सुविधा दिली जाईल. Google Pay खाते वापरकर्त्याला त्याचे तपशील देऊन बंद केले जाऊ शकते.
फोन पे
फोन पे वापरकर्त्यांना 08068727374 वर कॉल करावा लागेल. तुम्हाला पसंतीची भाषा निवडण्याचा पर्याय मिळेल. यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाकावा लागेल. आणि OTP आधारित पडताळणी करावी लागेल. तुम्हाला सिम किंवा डिव्हाइस हरवल्याची तक्रार करण्याचा पर्याय दिला जाईल, तो निवडा लागेल. त्यानंतर तुम्हाला हेल्प डेस्कशी कनेक्ट केले जाईल, जिथे तुम्हाला फोन नंबर, ईमेल आयडी, अंतिम पेमेंट माहिती यासारखे काही तपशील द्यावे लागतील. अशा प्रकारे तुमचे फोन पे खाते ब्लॉक केले जाईल.