मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे हे आज विधानसभेत अतिशय आक्रमक झालले पहायला मिळाले. कांदे यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते चर्चेत होते. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मनमाड दौऱ्यावेळीही कांदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यापूर्वी त्यांनी तत्कालिन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला होता. आता कांदे हे सत्ताधारी गटात असले तरी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. निमित्त आहे ते महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. याप्रकरणी राज्य सरकारने नेमकी काय कार्यवाही केली असा सवाल उपस्थित करीत कांदे यांनी आक्रमक पद्धतीने प्रश्न विचारले. अखेर फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. बघा, त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1562349791400837122?s=20&t=6rmz3a0fnx3nLMcPirDQ9Q
MLA Suhas Kande Aggressive in Assembly today Video