शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बिल्डरने घरावर जेसीबी फिरवल्यामुळे घरातील सदस्य संतप्त; परस्पर गुन्हे दाखल

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 3:27 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेहडीरोडवरील गिते मळा भागात बिल्डरने गावगुंडाच्या मदतीने कुटुंबियास बेदम मारहाण करीत राहत्या घरावर जेसीबी फिरवला तर संतप्त घरातील सदस्यांनी जेसीबीवर दगडफेक करीत चालकास चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तक्रारदारासह जेसीबी चालकाचे दात पाडण्यात आले आहे.
मनोहर पोपटराव गिते (६१ रा.गिते मळा,रेल्वे मालधक्काजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गिते बंधूनी वडिलोपार्जीत जमिनीवरील हक्कासाठी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र अन्य भावंडानी बांधकाम व्यावसायिकाकडून भरपाई घेत वस्ती सोडली. न्यायालयीन आदेशानुसार मालकी व्यावसायिकाला मिळाली, परंतू गिते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करायचे म्हणत जागा खाली केलीच नाही. म्हणून, बिल्डकॉन कंपनीच्या ठेकेदाराने मंगळवारी (दि.२३) पहाटे थेट जेसीबी संबंधिताच्या घरावर चालवल्याचा आरोप गिते यांनी केला आहे. गिते कुटुंबिय पहाटेच्या साखर झोपेत असतांना आठ ते दहा जणांचे टोळके घरात घुसले. या टोळक्याने कुटुंबियांना घराबाहेर काढत घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले. मनोहर गिते यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता विनोद गांगुर्डे नामक गावगुंडाने त्यांच्या हात पकडून तोंडावर बुक्का मारला. या घटनेत गिते यांचे दोन दात पडले. त्यामुळे पुतण्या मदतीला धावून आला असता त्यासही संशयिताने शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. गावगुंडाकरवी होणारी कारवाई थांबविण्यासाठी गिते यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या बिल्डर संदिप ठाकूर आणि अमरसिंग पाटील यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी जेसीबीद्वारे घर पाडण्याचे चालकास सांगून घराचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. तर विशाल भगवान पास्ते (रा.रेल्वे ट्रॅक्शन,संभाजीनगर एकलहरारोड) या जेसीबी चालकाने म्हटले आहे की, बिल्डर अमरसिंग पाटील यांच्या सांगण्यावरून मंगळवारी पहाटेच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने घर पाडले असता घरातील चार ते पाच लोकांनी थांबवून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच एकाने तोंडावर बुक्का मारल्याने दोन दात पडले असून या घटनेत जेसीबीच्या काचा फोडून नुकसान करण्यात आल्याचे पास्ते याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके आणि उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात दोन घटना

Next Post

आमदार सुहास कांदे विधानसभेत आक्रमक; फडणवीसांवर केली ही प्रश्नांची सरबत्ती (व्हिडिओ)

Next Post
suhas kande

आमदार सुहास कांदे विधानसभेत आक्रमक; फडणवीसांवर केली ही प्रश्नांची सरबत्ती (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011