India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या चौकशीचा अहवाल आला; आमदार सदा सरवणकर यांना दिलासा की?

India Darpan by India Darpan
March 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई  (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेश विसर्जनादरम्यान झालेला गोळीबार सदा सरवणकर यांनी केलेला नाही, असा अहवाल सादर करून मुंबई पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना क्लिन चिट दिली आहे. विशेष म्हणजे सरवणकर यांच्याच बंदुकीतील काडतुसे असले तरीही गोळीबार त्यांनी केलेला नाही, असे उत्तर विधीमंडळात देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाच्या विरोधात ठाकरे गटाने दंडच थोपटले होते. या घटनेनंतर मुंबईत दोन गट कधीतरी आमने सामने येतील आणि अघटित घडणार, याचा पूर्ण अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतरही काही दिवस पोलिसांची दोन्ही गटांवर करडी नजर होती. मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या पोलिसांच्या नजरेतून नेमकी हीच घटना सुटली.

गणेश विसर्जनादरम्यान ठाकरे व शिंदे गट आमने सामने आले. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर झटपटही झाली. याच झटपटीत गोळीबार झाला. त्यावेळी आमदार सदा सरवणकर तिथेच उपस्थित होते. गोळीबार झाला त्यावेळी तिथे एकच बंदूक होती आणि त्यामुळे त्याच बंदुकीतून सरवणकरांनी गोळीबार केला आहे, असा आरोप करीत ठाकरे गटाने कारवाईची मागणी लावून धरली होती. पोलिसांनी दिलेल्या अहवालात गोळीबार झाल्याचे नमूद केलेले आहे, पण तो गोळीबार सरवणकर यांनी केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रभादेवीतील घटना
प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनाची मिरवणुक निघाली होती. यावेळी ठाकरे व शिंदे गट आमने सामने आला होता. दोघांमध्येही वाद झाला आणि एकमेकांसोबत झटपट झाली. त्याचवेळी गोळीबार झाला. गोळीबार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतूनच झालेला आहे, पण तो सरवणकर यांनी केलेला नाही, असे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.

विधानपरिषदेत प्रश्न
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात विधान परिषदेेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि विक्रम काळे यांनी गोळीबाराचा प्रश्न उपस्थित केला. गोळीबारातील आरोपीवर कारवाई का झालेली नाही, असा सवाल करण्यात आला. त्यावेळी सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरातही, घटनास्थळावर सापडलेले काडतूस सरवणकरांच्या बंदुकीतील असले तरीही गोळीबार त्यांनी केलेला नाही, नमूद करण्यात आले आहे.

MLA Sada Sarvankar Firing Mumbai Police Investigation Report


Previous Post

रमेश अग्रवाल यांचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरने केला हा मोठा खुलासा

Next Post

लालूप्रसाद यादव यांच्या घरी ईडीला सापडले एवढे घबाड… सोने, रोख रक्कम, डॉलर, आणि बरंच काही..

Next Post

लालूप्रसाद यादव यांच्या घरी ईडीला सापडले एवढे घबाड... सोने, रोख रक्कम, डॉलर, आणि बरंच काही..

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group