इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– मिशन इयत्ता दहावी –
अवघड प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर गुण कसे मिळवावेत?
हातातून जाणारी बाजी कशी सावरावी?
परीक्षेच्या काळात अभ्यासाची पूर्ण तयारी करूनही कधी कधी अनपेक्षित प्रश्न येतात. सगळी प्रश्नपत्रिकाच अवघड वाटू लागते. विद्यार्थांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. काय लिहावं ते सुचत नाही. केलेला अभ्यास विसरला की काय असे वाटू लागते.
विद्यार्थी घाबरतात. काहीही सुचत नाही अशा वेळी मन कसे शांत करावे आणि अवघड वाटणार्या प्रश्नपत्रिकेतूनही भरपूर मार्क्स कसे मिळवावे याचे मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी इंडिया दर्पण आणि वेलकम दहावी आयोजित मिशन इयत्ता दहावी या विशेष मालिकेत केले आहे. विद्यार्थांना अशा प्रसंगी कसे वागावे आणि प्रश्नपत्रिका सोडवावी याचे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन या व्हिडिओत केले आहे.
– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam Difficult Exam Marks Video Guidance