इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक वर्षांनी यंदा पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मिसेस वर्ल्डचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या सरगम कौशलने ‘मिसेस वर्ल्ड २०२२’वर आपले नाव कोरले आहे. यावेळी हा कार्यक्रम अमेरिकेत आयोजित करण्यात आला होता. या सौंदर्यस्पर्धेत बॉलिवूडचे मोठे कलाकारही सहभागी झाले होते. तब्बल ६३ देशातील स्पर्धकांना मात देत सरगम कौशलने ही स्पर्धा जिंकली आहे. २१ वर्षांनंतर जेव्हा ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब भारताच्या नावावर झाला तेव्हा सरगम मंचावर भावूक होताना दिसली.
सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, गांधी नगर येथे झाले. तर गांधी नगर महिला महाविद्यालयातून पदवी आणि जम्मू विद्यापीठातून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले. सरगमने विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर तिने शिकवणी सोडून मॉडेलिंगची निवड केली. आणि आता तिने अत्यंत मानाचा असा पुरस्कार पटकावला आहे.
https://twitter.com/nagma_morarji/status/1605099053318311936?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी सरगमची लग्नगाठ बांधली गेली आहे. सरगमच्या वडिलांचे नाव जीएस कौशल तर आईचे नाव मीना कौशल आहे. यापूर्वी सरगमने मुंबईत झालेल्या ‘मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२’चे विजेतेपद पटकावले होते. मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२ जिंकल्यानंतर सरगम जम्मू येथे आली होती. त्यावेळी तिने आपले अनुभव शेअर केले. आपल्या या प्रवासात आपल्या पतीचा खूप मोठा सहभाग आणि पाठिंबा असल्याचे तिने आवर्जून सांगितले.
https://twitter.com/viralbhayani77/status/1606227495770005504?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
सरगमच्या यशाबद्दल बोलताना तिचे वडीलही थकत नाहीत. अत्यंत अभिमानाने ते मुलीबद्दल बोलत असतात. आज मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्यांना फक्त व्यासपीठ आणि समानता देण्याची गरज आहे. सरगम ही माझी मुलगी, या राज्याची आणि देशाची कन्या आहे, असे मी अभिमानाने सांगू शकतो. सरगम कौशल हिने मिळवलेल्या या सन्मानामुळे जम्मूमध्ये जल्लोष साजरा होतो आहे. भाजप नेते राजीव चडक, अनुराधा चडक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सरगम कौशलच्या बहू फोर्ट घरी पोहोचून कुटुंबीयांचा सत्कार केला. राजीव चडक म्हणाले की, सरगमने कठोर परिश्रमाच्या आधारे देशाचे नाव जागतिक पटलावर प्रस्थापित केले आहे.
https://twitter.com/ShabnamMir4/status/1604704910150623232?s=20&t=s_7MGR1xabcp6AwlFp_img
Miss World 2022 Sargam Kaushal Success Story