India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निसाकाचा भोंगा झाला… मेन गेट उघडले… १० वर्षांपासून बंद असलेल्या निसाकाच्या नूतनीकरणास प्रारंभ…

India Darpan by India Darpan
December 25, 2022
in स्थानिक बातम्या
0

योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्त सेवा
निफाडच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असलेला आणि सहकारातून भरभराटी घेणाऱ्या निफाड सहकारी साखर कारखान्याचा गेल्या दहा वर्षापासून बंद असलेला भोंगा, आज पुन्हा झाला,.. मेन गेट उघडले.. गेली दहा वर्ष निर्मनुष्य झालेले रस्ते, गर्दीने फुलले होते, हे सुखद चित्र निफाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी अनुभवले, निफाड साखर कारखान्याची चाके पुन्हा गतिमान होण्याची चिन्हे दिसू लागली असून या बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या नूतनीकरणाला शनिवार, २४ डिसेंबरपासून प्रारंभ झाला.

सामाजिक आणि आध्यात्मिक सेवा करावी, 10 वर्ष बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त करील त्यासाठी संबधित सर्वांना शुभेच्छा, निसाकाचा शुभारंभ होणार असून आज सोन्याचा दिवस आहे, कारखान्यासाठी आज असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.

10 वर्ष बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना नाशिक येथील ,बी डी कन्स्ट्रक्शन व अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल व एनर्जी ली, यांनी भाडेतत्वावर चालवायला घेतल्यानंतर कारखाना नूतनीकरण सोहळा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे,स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माणिकराव बोरस्ते होते,अनिल कदम,शिवा गडाख,अरविंद कारे,डी बी मोगल, भागवत बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

हेमंत गोडसे यांनी प्रास्ताविक मनोगतात 10 वर्ष कारखाना बंद आहे त्यासाठी जिल्हा बॅंकेकडून भाडेतत्वावर कारखाना चालवायला घेतला आहे,नाशिक कारखाना काही महिन्यांपूर्वी सुरू केला आणि 45 दिवसात कारखाना सुरू केला साखर पाडली,तो अनुभव पाठीशी घेऊन येत्या मे मध्ये टेस्टिंग व्हावी अशा पद्धतीने नूतनीकरनाचे काम सुरू आहे, इथेनॉल निर्मिती करणार आहोत,ऊस उत्पादसकांनी ऊस लावावा निसाका यशस्वी होईल,असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी निसाकाचे माजी अध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, माजी आमदार अनिल कदम,शिवगिरी महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष माणिकराव बोरस्ते म्हणाले की,7 लाख टनापर्यंत गाळप कारखान्याने केले आहे,द्राक्ष बागांना कंटाळले असल्याने आता शेतकरी उसाकडे वळतील पण उसाला दर चांगला मिळावा,,इतर कारखान्यांचा अनुभव लोकांचा वाईट आहे त्यामुळे आपण ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Niphad Sugar Factory Started After 10 Years


Previous Post

साधी शिक्षिका ते थेट मिसेस वर्ल्ड २०२२… असा आहे सरगम कौशलचा यशोप्रवास

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group