India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सॅल्यूट! जगातील श्रीमंतांंपैकी एक असलेल्या बिल गेटस यांनी त्यांच्या संपत्तीबाबत घेतला हा मोठा निर्णय

India Darpan by India Darpan
July 30, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मायक्रोसॉफ्टचे सह – संस्थापक बिल गेट्स यांच्या दानशूरपणाच्या कहाण्या आपण सगळ्यांनीच नेहमी ऐकल्या आहेत. जगभरातील समाजसेवी संस्थांसाठी बिल गेट्स आपली भरघोस संपत्ती दान करत असतात. आता बिल गेट्स आपली संपूर्ण संपत्ती दान करण्याचा विचार करत आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत वर्णी लागावी यासाठी स्पर्धा सुरू असताना बिल गेट्स संपत्ती दान करुन क्रमवारीतून एक्झिट घेत आहेत यातून त्यांचा दानशूरपणा दिसून येतो.

जगातील सर्वात श्रीमतांच्या क्रमवारीत गेट यांचा चौथा क्रमांक लागतो. आजपर्यंत ११३ अरब डॉलरची (अंदाजित ९.१० लाख कोटी) संपत्ती गेट्स यांच्याकडे आहे. गेल्या एक वर्षात गेट्स यांच्या संपत्तीत ६४४ मिलियन डॉलरची भर पडली आहे. बिल गेट्स यांनी नुकतंच ट्विटच्या मालिकेतून दातृत्वाची योजना सार्वजनिक केली आहे.

आपली संपूर्ण संपत्ती फाउंडेशनला दान करण्याचा विचार सुरू आहे. ज्यामुळे श्रीमंताच्या जागतिक क्रमवारीतून माझ्या नावाची घसरण होईल असे बिल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. चालू महिन्यात गेट्स २० अरब डॉलर रक्कम बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान करणार आहेत. बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ६ अरब डॉलरवरुन ९ अरब डॉलर प्रतिवर्ष संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष २०२६ पर्यंत वार्षिक ९०० कोटी डॉलर साधारणपणे ७१ हजार ९१०कोटी खर्च करणार आहे.

गेट्स आपल्या या दानशूरपणाबद्दल म्हणाले, “समाजासाठी पैसे दान करण्याच्या निर्णयाचा मला आनंद आहे. आपली संपत्ती समाजपयोगी कामासाठी परत करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. ज्यामुळे लोकांच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल होतील. जगासमोर सध्या मोठी संकटे आहेत. कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध तसेच हवामान बदलामुळं जनजीवन प्रभावित झाले आहे. त्यामुळे जगातील अन्य श्रीमंतानी संपत्ती दान देण्याबाबत निश्चितच विचार करावा” असं आवाहन गेट्स यांनी केलं आहे.

Microsoft Bill Gates Wealth Donation Planning


Previous Post

तुम्हाला अंधूक दिसते आहे का? हे आहे कारण

Next Post

हो, ग्राहकांचा होतोय छळ! रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाल्या एवढ्या तक्रारी

Next Post

हो, ग्राहकांचा होतोय छळ! रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाल्या एवढ्या तक्रारी

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group