इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मायक्रोसॉफ्टचे सह – संस्थापक बिल गेट्स यांच्या दानशूरपणाच्या कहाण्या आपण सगळ्यांनीच नेहमी ऐकल्या आहेत. जगभरातील समाजसेवी संस्थांसाठी बिल गेट्स आपली भरघोस संपत्ती दान करत असतात. आता बिल गेट्स आपली संपूर्ण संपत्ती दान करण्याचा विचार करत आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत वर्णी लागावी यासाठी स्पर्धा सुरू असताना बिल गेट्स संपत्ती दान करुन क्रमवारीतून एक्झिट घेत आहेत यातून त्यांचा दानशूरपणा दिसून येतो.
जगातील सर्वात श्रीमतांच्या क्रमवारीत गेट यांचा चौथा क्रमांक लागतो. आजपर्यंत ११३ अरब डॉलरची (अंदाजित ९.१० लाख कोटी) संपत्ती गेट्स यांच्याकडे आहे. गेल्या एक वर्षात गेट्स यांच्या संपत्तीत ६४४ मिलियन डॉलरची भर पडली आहे. बिल गेट्स यांनी नुकतंच ट्विटच्या मालिकेतून दातृत्वाची योजना सार्वजनिक केली आहे.
आपली संपूर्ण संपत्ती फाउंडेशनला दान करण्याचा विचार सुरू आहे. ज्यामुळे श्रीमंताच्या जागतिक क्रमवारीतून माझ्या नावाची घसरण होईल असे बिल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. चालू महिन्यात गेट्स २० अरब डॉलर रक्कम बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान करणार आहेत. बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ६ अरब डॉलरवरुन ९ अरब डॉलर प्रतिवर्ष संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष २०२६ पर्यंत वार्षिक ९०० कोटी डॉलर साधारणपणे ७१ हजार ९१०कोटी खर्च करणार आहे.
गेट्स आपल्या या दानशूरपणाबद्दल म्हणाले, “समाजासाठी पैसे दान करण्याच्या निर्णयाचा मला आनंद आहे. आपली संपत्ती समाजपयोगी कामासाठी परत करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. ज्यामुळे लोकांच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल होतील. जगासमोर सध्या मोठी संकटे आहेत. कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध तसेच हवामान बदलामुळं जनजीवन प्रभावित झाले आहे. त्यामुळे जगातील अन्य श्रीमंतानी संपत्ती दान देण्याबाबत निश्चितच विचार करावा” असं आवाहन गेट्स यांनी केलं आहे.
Microsoft Bill Gates Wealth Donation Planning