विशेष प्रतिनिधी, मुंबई
विंडोज ७ चा वापर करणार्या युजर्सना आता विंडोज ११ मध्ये अपग्रेड करता येणे सहज शक्य आहे. पण त्यासाठी एक इन्स्टॉल करण्याची गरज आहे. मायक्रोसॉफ्टच्या इनपूटवर आधारित असलेले विंडोज ११ FAQ पेज लेनोव्होने प्रसिद्ध केले आहे. विंडोज ७ युजर्स एका नव्या इन्स्टॉलद्वारे विंडो ११ मध्ये अपग्रेड करू शकणार आहेत. त्यासाठी युजर्सना आपल्या पीसीवर विंडोज ११ चा क्लिन इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी आपल्या डाटाचा बॅकअप घ्यावा लागणार आहे.
खरेदीसाठी उपलब्ध बहुतांश डिव्हाइस विंडो ११ अपग्रेड करण्यायोग्य असतील. विंडोज ११ मध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे विंडोज १० डिव्हाइसला अपग्रेड, क्लिन इन्स्टॉल किंवा रिइमेज करण्याचा पर्याय असेल. लेनोव्होच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या गाइडनुसार, हार्डवेअरच्या गरजा पूर्ण करणार्या विंडोज ७ डिव्हाइसाठी तुम्हाला थेट विंडोज ११ वर जाण्यासाठी इन्स्टॉल किंवा रिइमेजचा पर्याय वापरावा लागणार आहे.
हे गाइड लेनेव्हो युजर्ससाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. विंडोजचे जुने व्हर्जन वापरणार्या दुसर्या डिव्हाइसवरही हे लागू होणार आहे. त्यापूर्वी तुमचा पीसी विंडोज ११ वापरण्यासाठी अनुकूल आहे किंवा नाही, याबाबत सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
ज्या पीसीवर Intel 8th जनरेशनच्या चिप्स, AMD Zen 2 चिप्स, क्वालकॉम ७/८ सीरिज चिप्स किंवा नवे व्हर्जनवर सुरू असेल तोच विंडोज ११ इन्स्टॉल करण्यास सक्षम असेल, असे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. तुमचा नवीन पीसी विंडोज ११ चालविण्यास गरजांना पूर्ण करू शकतो किंवा नाही हे पाहण्यासाठी पूर्वी युजर्स मायक्रोसॉफ्टच्या PC Health Check app ला डाउनलोड करू शकत होते.
प्रारंभी सिस्टिमच्या गरजा पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज ११ च्या वेबसाइटवर जावे लागेल. विंडोज ११ मध्ये सीपीयूसाठी एक अँबेडेड TPM, सिक्योर Boot चा सपोर्ट, १ Ghz पेक्षा अधिक वेग, ड्युएल कोर प्रोसेसरची गरज असते. त्यासोबतच कमीत कमी ४GB रॅम आणि ६४ GB स्टोरेजची गरज असते.