सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मायक्रोमॅक्स कंपनीने Micromax In Note 2 हा तगडा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन निळा आणि चॉकलेटी अशा दोन कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन डॅझलिंग ग्लास फिनिशमध्ये उपलब्ध असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर काचेचा वापर करण्यात आला आहे. Micromax In Note 2 स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. क्वाड कॅमेरा सेटअप हे सुद्धा त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
बघा, या स्मार्टफोनचा व्हिडिओ
https://twitter.com/Micromax__India/status/1485862572356431877?s=20
Micromax In Note 1 हा स्मार्टफोन 6.67 इंच फुल HD+ IPS डिस्प्ले सह येतो. फोनला 450nits ची पीक ब्राइटनेस मिळते. फोनचा अॅस्पेक्ट रेशो 21:9 असा आहे. हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसर सपोर्ट सह सादर करण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज सपोर्ट मिळतो आहे.
Micromax In Note 1 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 48MP आहे. याशिवाय 5MP वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर सपोर्ट करण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Micromax In Note 1 स्मार्टफोन 5,000mAh बॅटरी सपोर्टसह येतो. ज्याला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. अशा प्रकारे हा स्मार्टफोन सगळ्या बाबतीत कुशल ठरणारा आहे. १२ हजार ४९० रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.