कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स : सकाळी ११:,००वाजता*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ९१८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १६ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९५३, बागलाण २२८, चांदवड २८७, देवळा ३७९, दिंडोरी ४३९, इगतपुरी २८२, कळवण १४४, मालेगाव १९२, नांदगाव ३०१, निफाड ८५०, पेठ १०८, सिन्नर ६५१, सुरगाणा ६३, त्र्यंबकेश्वर २२५, येवला २९६ असे एकूण ५ हजार ३९८ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १० हजार ९८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३३२ तर जिल्ह्याबाहेरील २७३ रुग्ण असून असे एकूण १६ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५१ हजार ६८८ रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १७०, बागलाण ५४, चांदवड ३४, देवळा २३, दिंडोरी ५३, इगतपुरी २०, कळवण २७, मालेगाव ५५, नांदगाव १३, निफाड ९७, पेठ १८, सिन्नर ५२, सुरगाणा ११, त्र्यंबकेश्वर २३, येवला १७ असे एकूण ६६७ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.२६ टक्के, नाशिक शहरात ९४.१९ टक्के, मालेगाव मध्ये ९४.८९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २५८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ४१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७८३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख ५१ हजार ६८८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख २५ हजार ९१८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १६ हजार ९८७ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)