नाशिक – मुंबई नाका परिसरातील गोविंदनगर भागात वृद्ध नागरिकाच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या चोरट्यांनी सोन्याचे दोन हार, चार बांगड्या, हिऱ्याची अंगठी, हात व पायातील वाळे तसेच पेंडल असा २ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. या चोरीप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोविंद नगर येथे प्रकार पेट्रोलपंप मागे असलेल्या ओंकारा रेसीडेन्सीच्या प्लॅट क्रमांक २ मध्ये ही चोरी झाली. मल्हार सिताराम आगरकर (वय ८३) असे प्लॅट मालकाचे नाव आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये ४ ते १७ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. फ्लॅटमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्यांनी २ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे हवालदार सोनार हे पुढील तपास करत आहेत.