शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

10 डिसेंबर रोजी होणार मतदान

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2021 | 7:30 pm
in राज्य
0
election 2

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यात धुळे-नंदुरबार, मुंबईतील दोन, कोल्हापूर, नागपूर, अकोला-बुलडाणा-वाशिम या जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या या सहा जागांची मुदत येत्या मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पुर्ण होत आहे. त्यात सध्या  धुळे-नंदुरबार मध्ये अमरिशभाई पटेल, मुंबईत काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास, अकोला-बुलडाणा-वाशिम येथे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे आमदार आहेत.  या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून आजपासून आचार संहिता लागू झाली आहे.

या निवडणूकीची अधिसूचना मंगळवार, दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस दि. 23 नोव्हेंबर (मंगळवार) 2021 आहे. दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर,2021 असा आहे.

या मतदार संघांसाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-१९/. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दरम्यान, सोलापूर आणि अहमदनगर या दोन ठिकाणची निवडणूक होणार आहे. या दोन्ही जागांची मुदतही जानेवारीतच संपत आहे. मात्र, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक मनपा मुख्यालयात आले अन् प्रत्येकी ५००चा दंड झाला; हे आहे कारण

Next Post

व्वा! १६व्या वर्षीच शिवाजी महाराजांवर लिहीले काव्यचरित्र; चिन्मय मोघेचे यश

Next Post
IMG 20211109 WA0021

व्वा! १६व्या वर्षीच शिवाजी महाराजांवर लिहीले काव्यचरित्र; चिन्मय मोघेचे यश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

मे 17, 2025
Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011