शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

व्वा! १६व्या वर्षीच शिवाजी महाराजांवर लिहीले काव्यचरित्र; चिन्मय मोघेचे यश

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2021 | 8:56 pm
in इतर
0
IMG 20211109 WA0021

नाशिक – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे ‘शिवप्रताप’ हे महाकाव्य पुरंदरे प्रकाशानामार्फत वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिकच्या आदर्श विद्यालय आणि एचपीटी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या चिन्मय मोघे उर्फ कवी समर यांनी नाशिक येथेच वयाच्या 16 व्या वर्षी या महाकाव्याची रचना केली आहे.

एकूण 19 वृत्तांत महाकाव्याची रचना करण्यात आली असून कवी समर यांनी रचलेल्या नव्या 2 वृत्तांचा आनंदही वाचकांना अनुभवता येणार आहे. अशा प्रकारचे मराठी भाषेतील हे पहिलेच महाकाव्य आहे. या पुस्तकात कै.दिनानाथ दलाल या सुप्रसिद्ध्य चित्रकारांची चित्रेही समाविष्ट करण्यात आली असून आतील सजावट चारुहास पंडित यांनी केली आहे. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले 3 हजार श्लोक आणि काव्यातील लयबद्धता हे महाकाव्याचे वैशिष्ट्य आहे.

कवी समर गोल्फ क्लब येथील शासकीय निवासस्थात असताना त्यांनी केवळ 50 दिवसात महाकाव्य लिहून पूर्ण केले. त्यानंतरदेखील त्यांनी मराठी भाषेतील लिखाण सुरू ठेवले असून ‘तथागत बुद्ध’ आणि ‘उर्मिला’ अशा दोन कादंबऱ्यांचे लिखाणही पूर्ण केले आहे. ‘संगीत चंद्रप्रिया’सारखे संगीत नाटक त्यांनी अथक परिश्रमाने मराठी रंगभूमीवर आणले. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी केली. त्यासाठी त्यांना बालगंधर्व संस्थेच्या कै.अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाकाव्य ’शिवप्रताप’ दोन प्रकारच्या आवृत्तीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुरंदरे प्रकाशनाच्या अमृतराव पुरंदरे यांच्यामुळे महाकाव्याची लाकडी आवृत्ती वाचकांना उपलब्ध होणार असून दुसरी जनआवृत्ती असणार आहे. महाकाव्यात छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन सहजपणे गाता येईल अशा शैलीत केले आहे. महाकाव्य रचनेचा निश्चय शाळेत असतानाच केला होता आणि त्यासाठी छत्रपति शिवराय यांच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीचा विचारही मनात येणे शक्य नव्हते. मराठी भाषेच्या सेवेसाठी आणखी लिखाण करायचे आहे, अशी प्रतिक्रिया कवी समर यांनी दिली आहे. या पुस्तकासाठी purandareprakashan.in या संकेतस्थळावर किंवा 9096083685 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

महाकाव्य शिवप्रतापची वैशिष्ट्ये
– ‘महाकाव्य शिवप्रताप’ची* पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
– ६५० पृष्ठांचा हा काव्यमय ग्रंथ आता सर्वत्र उपलब्ध आहे.
– मराठी भाषेतील १९ वृत्तांतले पहिले वृत्तबद्ध महाकाव्य.
– अगदी सोप्या मराठी भाषेत ३००० श्लोक.
– वृत्तबद्ध असल्याने गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध काव्य.
– छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे काव्यमय चरित्र.
– पद्मविभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना.

– कै. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा ग्रंथात समावेश.
– हे काव्य ‘कवी समर’ हे नाव घेऊन वयाच्या १६व्या वर्षी लिहिले.
– संपूर्ण महाकाव्य ५० दिवसांत लिहून पूर्ण केले.
– ‘पुरंदरे प्रकाशना’ने ग्रंथ प्रकाशित केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, बुधवारचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, बुधवारचे राशिभविष्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011