रायपूर (छत्तीसगड) – लग्न समारंभात थरारक किंवा धाडसी एन्ट्री करण्याचा प्रघात गेल्या काही वर्षात सुरू झाला आहे. त्यामुळेच क्रेनच्या माध्यमातून थेट सभामंडपात येणे, पालखीतून उपस्थितांना नमस्कार करणे, अवाढव्य फुग्यातून मार्गक्रमण करणे असे नानाविध प्रकार सध्या केले जात आहेत. येथील एका लग्न सोहळ्यात असेच एक धाडस अंगलट आले आहे. विवाह समारंभात स्टेजवर वधूवर आले. पण, काचेसारख्या भव्य फुग्यात हे वधू वर स्टेजवरुन हवेत उडाले. तब्बल ८ फुटावरुन त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरत होता. त्याचवेळी वधूवर हे ८ फुटांवरुन अचानक स्टेजवर कोसळले. त्यात हे दोघे जखमी झाले आहेत. साहसी प्रकार करण्यात त्यांनी स्वतःचाच जीव धोक्यात घातल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे असे प्रकार करु नये आणि केले तरी त्याची सुरक्षितता बघावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
एडवेंचर वेडिंग से सावधान
रायपुर में करीब 8 फीट की ऊंचाई से दूल्हा_दुल्हन धड़ाम से गिरे, मामूली चोट आई है लेकिन यादगार बनाने के लिए जान जोखिम में डालना सही नहीं है#Chhattisgarh pic.twitter.com/RPkEbCcsnB
— Ravi Miri (Vistaar News) (@Ravimiri1) December 12, 2021