नाशिक – शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही आरोग्याप्रती जागरुकता निर्माण व्हावी आणि ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना राष्ट्रीय स्तरावर धावण्याची संधी मिळावी, या हेतूने नाशिक रनर्स या संस्थेच्या वतीने २६ डिसेंबर २०२१ रोजी सप्तश्रृंगी हिल मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.* या उपक्रमाची घोषणा श्री सप्तश्रृंगी देवी संस्थानचे विश्वस्त डॉ प्रशांत देवरे आणि नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी केली.
१० किमी आणि २१ किलोमीटर अशा दोन टप्प्यांत ही मॅरेथॉन होणार आहे. या वर्षीचा मार्ग गडावरून नांदूरी पायथ्या पर्यंत व पुनः गडावर असाअसून सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग २१ किलोमीटरचा आहे. १० किलो मिटर ची सुरवात ६.४० वाजता होईल. स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष असून, यापूर्वीच्या चारही मॅरेथॉनप्रमाणेच आताही उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या उपक्रमात सहभागासाठी २० डिसेंबर पर्यंत नावनोंदणी सुरू आहे. अधिकाधिक व्यक्तींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
मॅरेथॅान यशस्वी होण्यासाठी संस्थेचे रेस डायरेक्टर नरेन अय्यर,सह सचिव सुजित नायर तसेच डॉ वैभव पाटील,डॉ सुनिल जगताप, डॅा. मनीषा रौंदळ, ,सुनिल देव प्रयत्न करीत आहेत. सदर मॅराथॉन करता ब्रँड अँबॅसॅडर म्हणून नाशिकमधील सर्व आयर्न मॅन यांची उपस्थिती राहणार आहे तसेच त्या प्रसंगी नाशिक येथील सर्व आयर्न मॅन यांचा सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी विनोद गोऱ्हे यांच्याशी ९८२२२७४८९९ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क : मेट्रो ९९, येस बँक इमारत, थत्ते नगर, कॉलेजरोड किंवा साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर.