मुंबई – राज्यात ओमिक्रम़न बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. मुंबईतील आणखी दोघांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० झाली आहे. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, मुंबईतील आणखी २ बाधिक झाल्याचे सिद्ध झाले आहे. दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून ३७ वर्षीय पुरुष २५ नोव्हेंबरला मुंबईत आला होता. तर, त्या रुग्णासोबत राहिलेल्या व २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. या दोघांनाही कुठलीही लक्षणे नाहीत. तरीही त्यांना उपचारार्थ हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.